राजकिय

भव्य दिव्य असा निघाला संघर्ष मोर्चा

Spread the love

 

अरविंद वानखेडे यवतमाळ वार्ता

आज दिनांक 24 रविवारला यवतमाळ शहर घोषणा मी अक्षरशा गद मारून गेले जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला बेरोजगार, शेतकरी जुनी पेन्शन योजना, कंत्राटी पद्धतीने भरती करत असलेल्या नोकर भरतीचा आशा वर्कर अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार असे एक ना अनेक प्रश्न घेऊन यवतमाळ येथील आझाद मैदानामध्ये बहुसंख्येने लोक उपस्थित होते,

आमदाराची पोरगी काय म्हणते कंत्राटी नवरा नको पाहिजे या घोषणेने तर संपूर्ण यवतमाळ करांचे लक्ष या मोर्चाने वेधून घेतले होते प्रत्येक मागणी शासनाने मान्य केलीच पाहिजे या सरकारचे कराचे काय खाली डोकं आणि वर पाय अशा विविध प्रकारच्या गगनभेदी घोषणा देऊन शासनाचा निषेध केला, हा मोर्चा संपूर्ण यवतमाळ शहराच्या मुख्य भागातून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

संघर्ष मोर्चाचे नेतृत्व मुख्य संयोजक महसूल विभाग नंदकुमार बुटे, संयोजक डॉक्टर विजय ठाकरे, मंगेश वैद्य आशिष जयसिंगपूर त्याचप्रमाणे, संजय पारधी, निळकंठ हुलसंगे, गुलाबराव डोंगरे, दत्ता ठाकरे, संजय हातगावकर प्रामुख्याने उपस्थित होते जिल्ह्यातील विविध संघटनांनी या संघर्ष मोर्चाला पाठिंबा दिल्या असल्याचे समजते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close