घाटंजी तालुक्यातील अल्पवयीन तरूणाईचे प्रेम प्रकरण व रासलिलेच्या प्रकरणात वाढ

प्रेमाच्या नावाखाली अनेक तरूणीचे लैंगिक शोषन.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार.
घाटंजी तालुक्यातील सध्याचे युवा व अल्पवयीन तरूणाई साठीचे चित्र भयावह आहे. शोषल मिडीयावर वाढतं आकर्षण व मोबाईल अतिवापरामुळे शोषल मिडीयावर नको ते बघण्यात येणारी चित्र,अल्पवयात प्रेम प्रकरण त्यातून वाढत्या वयाबरोबर शरिरातील होणारी बदल त्यातून उद्भवणाऱ्या कामवासना सोबतचं तरूनाईत वाढत असलेली आपसी क्रेझ त्यामूळे अल्पवयीन तरूणाई खरा मार्ग सोडून क्षणीक सूखासाठी वाममार्गाला भरकट आहे. प्रेम या शब्दाची परिभाषा आता केवळ लैंगिक सूखासाठी मर्यादित होत असल्याचे दिसून येते. प्रेम या शब्दाचा वापर करत हवस भागवणारे टावाळखोर,मदमस्तवृत्तीचे क्षणिक सूखासाठी वाममार्गाला भरकटली जात आहे. गाव सोडून शिक्षणाच्या उद्देशाने येणा-या मूली व गावातील ही अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाला सामोरे जावे लागते आहे. सध्या भयावह परिस्थिती पाहता स्टेशन डायरीत एक न अनेक प्रकरणं अल्पवयीन अत्याचार बाबत येत असून काही प्रकरणं ही अल्पवयीन मुलीच्या बाबतीत असल्याने त्यांची पालक बदनामीचे धाकाने आपसात समेट करत असल्याचेही पष्ट असून ख-या प्रेम शब्दाची व्याख्याचं बदलून गेली हे चित्र आहे.लैगिक अत्याचार कायदा कडक असला तरी,आरोपी व पिडीत दोन्ही अल्पवयीन असल्याने पोलिस प्रशासन ही अशा प्रकरणात हतबल होत आहे. आता श्रावण लागत असून सगळीकडे हिरवळ व निसर्गरम्य वातावरण आहे तेव्हा घाटंजी ता. परिसरातील नैसर्गिक पर्यटन स्थळे व देवस्थाने,रम्यस्थानी हे क्षणीक सुखभोगू प्रेमाच्या नावाखाली झास्सा देत अनेक अल्पवयीन मुलींच्या जिवणासी खेळतील व लैंगिक उपभोग घेतील हे नाकारता येत नाही म्हणून पोलिस प्रशासनाने अशा टवाळखोर, लैंगिक सूखभोगू, हरामखोरांना खाक्या दाखवत वठणिवर आणणून अल्पवयीन मुलीच्या जिवणासी खेळखेळणा-यावर कठोर कार्यवाही करावी ही मागणी जनतेतून जोर धरत आहे.सोबतच प्रत्येक पालकाने आपले पाल्यावर कटाक्षाणे लक्ष ठेवत वेळोवेळी मार्गदर्शन करणे ही तितकेच महत्वाचे आहे.