राजकिय

दादांचा गट म्हणतो आशीर्वाद घेण्यासाठी तर मोठ्या पवारांचा दिलगिरी व्यक्त करण्यासाठी

Spread the love

मुंबई / नवप्रहार वृत्तसेवा 

            अजित दादा यांनी राष्ट्रवादी च्या आमदारांसह पक्ष सोडत शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन दिले.अजित दादा यांच्या मते खरी राष्ट्रवादी त्यांचीच तर जयंत पाटील म्हणतात खरी राष्ट्रवादी त्यांची. अजित दादा सोबत गेलेल्या आठ आमदारांना सरकार मध्ये मंत्रिपद सुद्धा देण्यात आले आहे. पण दादा आपल्या काही आमदारांसह शरद पवार यांना भेटायला गेले होते. दादा गटाचे पटेल यांच्या नुसार ते आशीर्वाद द्यायला गेले होते. तर जयंत पाटील यांच्या नुसार ते दिलगिरी व्यक्त करायला आले होते. खरं काय ते अद्याप गुलदस्त्यात आहे.

 राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते.

या भेटीमध्ये नेमकं काय झालं, तसंच शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दलची माहिती प्रफुल पटेल आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे

 प्रफुल पटेल असे म्हणाले ? शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत.

सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

जयंत पाटील हे म्हणाले –  ‘मी अंबादास दानवे यांच्या बैठकीत होतो. अचानक मला फोन आला, त्यांनी शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी जे काही केलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्या काही घटना झाल्या त्यामध्ये मार्ग काढावा, अशी विनंती त्यांनी केली, पण शरद पवार काहीही बोलले नाहीत. अचानकपणे भेट घेण्यामागे काय उद्देश आहे, हे माहिती नाही,’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close