सायकल स्वार मावळ्याचे वरुड नगरीत आगमन .
वरुड सायकल स्वार बहुउदेशीय संस्थेकडून जल्लोषात स्वागत.
वरूड/तूषार अकर्ते
मावळा म्हटला कि त्यांच आदरणीय स्थान डोळ्या समोर उभ राहत ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजांचे नाव कंटास्थानी घेऊन आगळे वेगळे उपक्रम करणारे बऱ्याच अश्या शिव भक्तांविषयी आपण ऐकलं असेलच परंतु अश्याच एका मावळ्याचे दर्शन आपल्या संत्रा नगरिला लाभले आहे.सुबोध गांगुर्डे हे त्या मावळ्याच नाव आहे.वक्ती एक उद्देश मात्र नेक तो म्हणजे सायकल ने भ्रमंती करून ३६५ दिवसात तब्बल ३७० किल्यांवर सर करून त्या किल्याची माती गोळा करून त्यातून छत्रपतींची मूर्ती साकारायची व माऊंट एव्हरेस्ट वर तिची स्थापना करायची हे धाडस करणाऱ्या या ध्येय वेड्याचे वरुड मध्ये आगमन झाले आहे.
रायगड जिल्यातील रोहा येथील चोवीस वर्षीय सुबोध छत्रपतींच्या विचाराने पछाडलेला हिंदवी स्वराज्याची भगवी पताका हाती घेऊन जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वर फडकवावा हीच त्याची जिद्द आणि भारत भ्रमनतिचा हा संपूर्ण प्रवास तो सायकल वर करतोय ही मात्र त्याची अजून एक विशेष बाब यातुन बघायला मिळाली आहे.
२३० दिवसात तब्बल १३००० कि.मी. चा प्रवास करून वरुड नगरीमध्ये सुबोध गांगुर्डे याचं आगमन झाले आहे.वरुड नगरी मध्ये आगमन होण्याची बातमी कळताच वरुड सायकल स्वार बहुद्देशीय संस्थेचे सदस्य देवानंद मेश्राम, पियुष खंडेलवाल, चेतन पानसे, अनुप जैन, श्रीकांत विटाळकर व पराग भोंडे यांनी उपस्थित राहुन त्यांचे स्वागत केले आहे.तर सचिन देशमुख यांच्या कडे सुबोध ची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. वरुड नगरीतून प्रस्थान करतेवेळी वरुड सायकल परिवारातील सदस्यांनी आवश्यक शिदोरी भेट म्हणून सुबोध ला दिली आहे.उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून पुढील वाटचाली करिता सुबोध ला शुभेच्छा दिल्या आहे.