जिल्ह्यातील 71 हजार 470 बालकांची तपासणी;
अतिसार नियंत्रण पंधरवड्यात आढळले २२५ अतिसाराचे रुग्ण
नव प्रहार ( मूर्तिजापूर) अनिल डाहेलकर
आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नियंत्रण पंधरवडा सुरू करण्यात आला आहे.
एकूण ७१ हजार ४७० बालकांची तपासणी करण्यात आली असून,
आतापर्यंत तपासणी झालेल्या बालकांमध्ये २२५ बालकांना अतिसार असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.
नवजात अर्भक व ५ वर्षाआतील एकूण बालमृत्यूपैकी ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे
आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस देऊन
ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन
पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ६ जून ते २१ जून दरम्यान आरोग्य विभागाकडून
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम ही उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये
पूर तसेच नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची पूर्वतयारी आहे.
या मोहिमेत ८०४ आशा व आरोग्य कर्मचारी यांनी पाणी शुद्धीकरण, वैयक्तिक स्वच्छता तसेच ओआरएस तयार करण्याचे प्रात्यक्षिक व हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून जास्तीत जास्त जनतेपर्यंत जनजागृती केली. या पंधरवड्यात पाच वर्षाच्या आतील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यांच्या परिवारातील सदस्यांना क्षार संजीवनी कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. मोहिमेदरम्यान ग्राम स्तरावर १ हजार ४९८ ठिकाणी स्वच्छता व पोषण मोहीमबाबत मार्गदर्शनपर सत्र तसेच ६५८ बालकांना प्रतिबंधात्मक अतिसार होऊ नये,
या दृष्टीने ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
मोहिमेचा उद्देश
नवजात अर्भक व ५ वर्षों आतील एकूण बालमृत्यूपैकी
५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात.
अतिसारामुळे होणारे बालमृत्यूदर हा मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
अतिसाराची लक्षणे
जर बाळ अस्वस्थ, चिडचिडे झाले, बालकाला (दोन महिन्यांपेक्षा मोठ्या)
खूप तहान लागत असेल, किंवा ते पाणी पिऊ शकत नसेल,
त्याला भोवळ आली किवा बेशुद्ध झाले जर डोळे खोल गेले,
पोटावर हलका चिमटा काढल्यावर त्वचा अगदी मंद गतीने नेहमीच्या स्थितीत जाते