दोन युवकांचा मारामारीत एक जखमी
वरूड/तूषार अकर्ते
येथुन जवळच असलेल्या शेंदूरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील पूसला येथे दि.१३ जुलै रोज गुरूवार ला संध्या. ७ वाजताच्या दरम्यान राहुल डोंगरे व प्रकाश पाटिल या दोघांमध्ये उसणावारीच्या व्यव्हारातुन जोरदार भांडण झाले भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले.यामध्ये प्रकाश पाटील यांचा डोक्याला जबर मार लागल्याने ते यात जखमी झाले.या बाबत शे.घाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.सदरील तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गून्हे दाखल केले आहे.
प्राप्त माहिती नुसार विलास नामदेव पाटील (४६) हे घरी असताना त्याला माहिती मिळाली की त्यांचा पुतण्या प्रकाश सुरेश पाटील व गावातीलच राहुल सुधाकर डोंगरे (२६) रा.पुसला यांच्या घरासमोर या दोघात भांडण सुरू आहे अशी माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्यांच्या पूतण्या प्रकाश पाटील व राहुल डोंगरे यांच्यात जोरदार भांडण सुरू होते. त्यात राहुल डोंगरे यांने प्रकाश पाटील याला जमिनीवर पाडून लाथा बूक्याने व डोक्यावर दगडाने मारून जखमी केले. या भांडणात प्रकाशच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला असता त्याचा दोन मित्रांनी त्याला तात्काळ दुचाकीवर बसून प्रार्थमिक उपचाराकरीता पुसला येथील रूग्णालयात दाखल केले तेथुन ग्रामीन रूग्णालयात हलवले व तेथुन त्याला पुढील उपचाराकरीता अमरावती येथे पाठवण्यात आले.राहुल डोंगरे व प्रकाश पाटील या दोघांमध्ये उसनवार पैशाचा व्यवहाराचा वाद असून पैशाच्या व्यवहारावरून राहुलने प्रकाशला दगडाने मारून जखमी केले आहे.या बाबत फिर्यादीने शे.घाट पोलिसात तक्रार दाखल केली असुन सदरील तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून तपास घेतला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे.