विश्राम गृह चांदुर रेल्वे येथे पीपल रिपब्लिकन पार्टीची बैठक
तालुका प्रतिनिधी- प्रकाश रंगारी
(चांदुर रेल्वे ) चांदुर रेल्वे येथील विश्रामगृहात आज रोज शनिवार दिनांक 02/03/2024 ला दुपारी दोन वाजता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष *चरणदासजी इंगोले* यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल रिपब्लिकन पार्टीची बैठक बोलावण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यात पक्षाद्वारा बैठकांचे सत्र राबविण्यात जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली असे मत कार्याध्यक्ष चरणदास जी इंगोले यांनी या बैठकीमध्ये मांडले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण मन लावून पक्षासाठी काम केलं पाहिजे असे सर्व पीपल रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
ह्या बैठकीला तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ रंगारी उपस्थित होते. प्रकाशभाऊ रंगारी यांनी आपले मत मांडताना कार्यकर्त्यांना एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला. यावेळी पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष बबनराव मोहोड , मनोज हरणे, भोजराज सोनोने, योगीदूत चतुर, गोवर्धन नाईक, निवृत्ती शेंडे, रोशन मोहोड, शंकरराव गवई, संदीप माहूरले, अशोक देवघरे, सौ.नलिनीताई शेंडे, प्रेमिलाताई वालोंद्रे, यांची बैठकीला उपस्थिती होती.