नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतक-यासाठी घाटंजीतील न.प. कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिकआपत्तीग्रत शेतकरी यांना मदत म्हणून राज्यातील सर्व शासनाचे अधिकारी/कर्मचारी यांच्यामाहे जून २०२३ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाद्वारे आव्हाहन करण्यात आले होते.या आव्हानास साथ देत घाटंजीतील
नगर परिषद येथील मा. मुख्याधिकारी श्री अमोल माळकर,सर्व संवर्ग,न.प कर्मचारी सफाई कामगार यांनी आपले एक दिवसाचे वेतन गोळा करून रू 76205/ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा केले आहे.नगर परिषद मध्ये काम करणारे सर्व कर्मचारी ही शेतकऱ्याची चं मुले असल्यामुळे व मा.मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या आव्हाना नुसार नगर परिषद मधील 100% कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी नगर परिषद कर्मचारी संघटना चे उपाध्यक्ष राजू घोडके यांनी कळविले तसेच कर्मचारी बांधवांनी एकमताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक दिवसाचे वेतन कपात करू देणेबाबत चा निर्णय घेतल्यामुळे सर्व नगर परिषद कर्मचारी यांचे आभार न.प.कर्मचारी संघटना सचिव विकी शेंद्रे यांनी मानले.