क्राइम

जरूडातुन गावठी हातभट्टी दारू सह ६८ हजाराचा मूद्देमाल जप्त

Spread the love

वरूड/तूषार अकर्ते

मध्यप्रदेशातुन गावठी हातभट्टी दारू वरूड पोलिस स्टेशन हद्दीतील जरुड येथे येत असल्याची माहीती वरूडचे नवनिर्वाचित ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली होती. या बाबत त्यांनी जरुड पोलीस चौकी व डीबी पथकास मध्यप्रदेश मधुन येणाऱ्या गावठी हातभट्टी दारु ची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. डीबी पथक व जरुड पोलीसांना गोपनिय माहीती मिळाली की जरुड येथील इंद्रपाल ढोले हा सुरज किसनराव हरले व जिवन प्रभाकर भंडारे यांचे मदतीने विनापरवाना अवैधरित्या गावठी हातभट्टी दारुची विक्री करत आहे.अशा माहीतीवरुन डीबी पथक व जरुड चौकीतील पोलीसांनी दि.७ जुलै रोज शुक्रवार ला सकाळी ८ वाजता दरम्यान जरुड येथील गुलाब कॉलनीत सापळा रचुन रेड केली असता एका गोठयातुन इंद्रपाल ढोले हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला व सुरज किसनराव हरले (२३) , जिवन प्रभाकर भंडारे (२५) दोन्ही रा.जरूड हे गावठी हातभट्टी दारु विकतांना मिळुन आले त्यांच्या गोठयाची पाहणी केली असता गोठयात २० प्लास्टिकच्या पोत्यातुन ५००० रूपयांचे गावठी हातभट्टीने भरलेल्या एकुण ५०० प्लास्टिक बॉटल, १५००० रूपायांचे गावठी हातभट्टी दारुने भरलेले रबरी काळया रंगाचे टयुब तसेच गावठी हातभट्टी दारु प्लास्टीकच्या बॉटलमध्ये भरण्याकरीता वापरण्यात आलेले ३००० रूपायांचेे साहित्य असा एकुन ६८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे,व ठानेदार अवतारसिंग चव्हाण यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धिरज राजुरकर, राजु मडावी, सुनिल आकोलकर, विनोद पवार,राजु पवार, सचिन भगत , निलेश भुयार, आकाश शेंडे , प्रफुल्ल लेव्हलकर यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close