पारव्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखतांच्या नोंदी प्रकरणी तक्रार.
सरपंच, सचिवासह दुय्यम निबंधकांचा सहभाग.
आठ जणांविरोधातील तक्रारीने तालुक्यात एकच खळबळ
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील पारवा येथे खोट्या कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनीचे खरेदी खत तयार करून दुय्यम निबंधकांकडे नोंदी घेतल्या जात आहे या फसवणुकीची तक्रार पारवा पोलिसांकडे करून आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली असल्याणे विविध चर्चेला उधाण आली आहे.
तालुक्यातील पारवा येथील योगेश देशमुख,शिल्पा घावडे, प्रदीप उत्तरवार,दर्शन मानगावकर, अशोक तुम्मलवार पारवा ग्रामपंचायत सचिव,सरपंच व घाटंजी येथील दुय्यम निबंधकांविरोधात पारवा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असल्याची माहिती कळते आहे.पारवा ग्रामपंचायत अंतर्गत गावाला लागूनच शासकीय जमीन शेत सर्व्हे गट क्रमांक १४४ आहे. त्याचे क्षेत्रफळ ४ हेक्टर ०८ आर असून, ‘एफ वर्ग’ ची शेतजमीन आहे. त्यामध्ये एक हेक्टर ९७ आर ही शेतजमिन वसंत जिनिंगची असून, दोन हेक्टर ११ आर जमीन सरकारची आहे.
याबाबत सातबारा उताऱ्यावर नोंदी आहे. परंतु योगेश पारवेकर हे सदर शेतजमिनीचे तुकडे पाडून शिल्पा घावडे, प्रदीप उत्तरवार, दर्शन मानगावकर, अशोक तुम्मलवार तसेच अनेक व्यक्तीपासून बनावट करारनामे लिहून त्याच्या खोट्या खरेदी आहे. दुय्यम निबंधक यांचे समक्ष नोंदवून घेत आहे. या प्रकाराला पारवा ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव खोट्या नोंदी घेऊन सहकार्य करीत आहे. शासकीय जमीन शेत भुमापन क्रमांक १४४ एकूण क्षेत्रफळ चार हेक्टर ०८ आर ही ‘एफ वर्ग’ शेतजमीन आहे. मात्र त्यानंतरही योगेश पारवेकर अन्य लोकांसोबत कट रचून खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून करारनामे, खोटे खरेदी खत नोंदविणे, शासकीय जमिनीचे ले-आउट नसताना ग्रामपंचायत कार्यालयातील रेकार्डला खोट्या नोंदी घेऊन शासकीय जमिनीचे तुकडे पाडून esपणे आदी गैरप्रकार करीत फसवणूक करीत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. महसूल व शासकीय रेकॉर्डला नोंद नसतानाही खोट्या कागदपत्रांवर व्यवहार सुरू असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे तक्रारदाराने माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता माहिती पुरविण्यात आलेली नाही मात्र,नंतर कागदपत्रे पुरविली असल्याचे तक्रारीत नमुद आहे. पारवा व घाटंजी येथील आठही जणांविरुद्ध तत्काळ गुन्हे नोंदवून अटक करावी, अशी मागणी तक्रारदार संतोष दवने यांनी प्रतिज्ञालेखाद्वारे पारवा पोलिसांकडे केली आहे त्या प्रकरणातील तक्रार अर्ज चौकसी सुरू असल्याचे परवा ठाणेदार लिंगाडे साहेब यांच्या कडून प्रथम दर्शनी माहितीतून कळते आहे. तसेच तक्रार कर्तेणी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनाही तक्रार पाठविण्यात आल्याचे कळते.या तक्रारीमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.