हटके

आता जरांगे पाटलाच्या विरोधात करण्यात येणार उपोषण

Spread the love

बार्शी ( सोलापूर ) / नवप्रहार डेस्क 

मराठ्यांना ओबिसीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी राज्यभर रान उठवून मराठा समाजाचे जवळजवळ दैवत बनलेल्या जरांगे पाटलाच्या विरोधात आता मराठा समाजच उभा ठाकल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे यांना प्रश्न विचारत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

              मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या पवित्र्याला पाहून राज्य सरकारने देखील धास्ती घेतली होती. वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. पण एक वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या हाती काय लागले, असा उद्वेग स्वतः जरांगे पाटील यांनी नुकताच अंतरवाली सराटी येथे केला होता. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. त्यानंतर आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातच आता खुद्द जरांगे पाटील यांच्याविरोधातच एका उपोषण होऊ घातले आहे.

मराठा बांधवांनी काय विचारला सवाल

महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवानी मनोज जरांगे पाटील यांना असा सवाल विचारला आहे. आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसणार अशी घोषणा करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना सवाल केला आहे.

किती जातींशी वैमनस्य घ्यायचं ते तरी सांगा?

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा, असा सवाल शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे.

नाहीतर उपोषणाला बसणार

देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का? पुढील आठ दिवसात माझ्या या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close