राजकिय

‘ पंकजा ‘  ‘ पंकज ‘ ला जय श्री राम करण्याच्या तयारीत ? 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

राज्यात राजकीय अस्थिरता असल्याचे मागील काही दिवसात प्रकर्षाने जाणवत आहे. अजित दादा यांनी राष्ट्रवादीला ‘ रामराम ‘ करत शिंदे फडणवीस सरकार मध्ये शामिल झाले आहे. धनंजय मुंडे हे अजित दादा सोबत असल्याने पंकजा मुंडे या आपल्या राजकीय भविष्याला घेऊन अस्वस्थ झाल्या आहेत.त्यामुळे त्या  पंकज (कमळ) सोडुन कांग्रेस च्या वाटेवर असल्याचे बोलल्या जात आहे. या कारणाने राज्यात आणखी एक राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बीड मध्ये झालेंल्या सभेत त्यांनी संकेत दिले होते.

          विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे फडणवीस सरकार मध्ये शामिल झाले आहेत. त्यांच्या सोबत धनंजय मुंडे देखील आहेत त्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे  यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघातून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं असून त्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे, असा सवाल नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर स्वागत आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. सोनिया गांधींशी त्यांची चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे, असं नाना पटोले म्हणाले. पटोले यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवेळी भाजपने एक वातावरण निर्माण केलं होतं. भाजपचे लोक बेताल विधान करत होते. काँग्रेसचे लोक सोडून जातील असं सांगितलं जात होतं. काँग्रेसची बदनामी करण्याचं काम भाजप करत आहे. आमचे कोणीही सोडून जाणार नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो ते खरंच निघालं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप नेहमीच लक्ष विचलीत करत आला आहे. केवळ काँग्रेसची बदनामी करण्यासाठीच हे सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाषण केलं. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीचा आरोप केला. त्यांच्या या भाषणाचे व्हिडीओ आम्ही लोकांना दाखवणार आहोत. त्यानंतर दोन दिवसाने महाराष्ट्रात भाजपने पाप केलं. बुलढाण्यात मोठा अपघात झाल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी शपथविधी सोहळा आयोजित केला. भाजपला लाजही वाटली नाही. भाजपचा हा चेहरा आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडलं जात आहे. भ्रष्टाचार हा भाजपचा डीएनए आहे. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे. विचारात आहेत. भ्रष्टाचार वाढवणं, त्याला पाठी घालणं हे भाजप करत आला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीत वेगळं काय घडलं? पण कर्नाटकाच्या लोकांनी त्यांना जागा दाखवलं, अशी टीकाही त्यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close