ओडिसा येथील जनजाती खेळमहोत्सवात महाराष्ट्र संघानी पटकावले उपविजेतेपद.
घाटंजी तालुक्यातील पारधी समाजातील विजय राठोड यांनी योगासनांचा चतधरारक प्रदर्शन.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
भारताच्या कल्चर मिनिस्ट्री ऑफ इंडियाच्या मान्यतेने प्रथम जनजाति खेळ महोत्सव के आय आय टी युनिव्हर्सिटी भुवणेश्वर ओडिसा येथे अयोजित करण्यात आले होते या स्पर्धेचा एकमात्र उद्देशआदिवासी समाजामध्ये जे कलाकौसल्य आहे त्याला मंच मिळाला पाहिजे असा होता. आणि त्यातून त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि आदिवासी समाजातील कलाकारांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत संपूर्ण भारतातुन एकुन 26 राज्य सहभाग झाले होते प्रत्येक राज्यांची निवड चाचणी घेण्यात आली होती ज्या खेलाडुंची निवड झाली त्याच खेलाडूनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यात अनेक खेळ घेण्यात आले त्यापैकी
योगासन या खेळ स्पर्धेत यवतमाळ मधून महाराष्ट्र संघमध्ये नितिन राठोड़, विजय राठोड़ यांची निवड करन्यात आली होती. ह्या स्पर्धेत 9 ते 12 जून दरम्यान योगासनाच्या स्पर्धा संपन्न झाल्या त्यात महाराष्ट्राच्या मुलांनी सांघिक योग प्रकारात रजक पदक प्राप्त केले या संघात वैभव श्रीरामे,प्रणय कंगाले, सुनील गोटा,रामानंद राऊत, नितीन राठोड,विजय राठोड आणि मुलींनी कास्य पदक प्राप्त केले यात पूजा जमादार,अंकिता गजबे, ख़ुशी कोहळे,वेदश्री गजबे,शिल्पा पिंपळे,गायत्री नारनवरे इत्यादी खेळाडूंचा सहभाग होता महाराष्ट्र संघ या स्पर्धेत सिल्वर मेडल उपविजेता ठरला.या विजयामुळे महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यातील विजय राठोड आणि नितीन राठोड या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे विजय राठोड यांस योगासन बदल रामदेव बाबा यांनी सुद्धा कौतुकाची थाप दिली आहे व तो घाटंजी तालुक्यातील घोटी पारधी बेडा या अतिमागास पारधी समाजातील आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरी केल्याबद्दल सर्व स्तरावर कौतुक होत आहे.