क्राइम

लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास एसीबी ने घेतले ताब्यात

Spread the love
 

नवी मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क .

                     महिलांना पुरुषासारखे समान अधिकार मिळावे यासाठी मागील काही काळात ओरड होत होती.त्यानंतर महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात आले. महिला नोकरीत आल्यावर भ्रष्ट्राचारावर आळा बसेल असे वाटले होते. पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे बोलून दाखवणाऱ्या महिला बाकी क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करो अथवा न करो पण भ्रष्टाचाराच्या बाबतीत महिला अधिकारी देखील पुरुषांची बरोबरी करतांना आढळून येत आहे. उरण पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे

सिंधू तुकाराम मुंडे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. एसीबी, ठाणे येथील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे 60 हजार रुपयांची मागणी केली होती.

मात्र, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंडे यांना 50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाण्यात 50 हजारांची लाच मागणाऱ्या 52 वर्षीय महिला नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली होती. फेरफार आक्षेप नोंदविण्याचा अंतिम अहवाल देण्याच्या बदल्यात त्यांनी मागितलेल्या 1.50 लाख रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना पकडण्यात आले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close