क्राइम

वाचा पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्ट वर का ओतले उकळते तेल 

Spread the love

ग्वाल्हेर / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                 पत्नी शेजारच्या तरुणाशी सतत मोबाईल वर बोलत असल्याची बाब पतीला माहीत होती. त्याने तिला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या वागण्यात कुठलाच फरक पडला नाही. घटनेच्या  दिवशी सुद्धा पत्नी शेजारच्या युवकासोबत मोबाईल वर बोलत असल्याचे पाहून त्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला या प्रकाराने ती ईतकी संतापली की तिने पती रात्री झोपला असतांना त्याच्या प्रायव्हेट परत वर उकळते तेल ओतले.

घटना कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील माधवी नगर येथील आहे. येथे राहणारा 32 वर्षीय सुनील धाकड खाजगी नोकरी करतो. तो आपली पत्नी भावना हिच्यासोबत राहतो. काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुनीलकडे तक्रार केली होती की, तो बाहेर गेल्यानंतर त्याची पत्नी भावना ही तिच्या पतीशी बोलते. महिलेने असेही सांगितले की, आपल्या पतीशी न बोलण्याबाबत तिने अनेकदा भावनाला समजावले होते मात्र तिच्यावर काही फरक पडला नाही.

एके दिवशी पती सुनील घरी आला असता भावना या शेजारच्या पुरुषाशी मोबाईलवर बोलत होती. त्याने अनेकता भावनाला या पुरुषाशी बोलण्यास मनाई केली मात्र तिने यासाठी नकार दिला. तिने मोबाईलवरील आपले बोलणे थांबवले नाही त्यामुळे संतापलेल्या सुनीलने भावनाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी रागाच्या भरात भावना निघून गेली आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नवरा झोपला असताना तिने किचनमध्ये तेल उकळले आणि त्याच्या गुप्तांगावर ओतले.

तेल इतके गरम होते की त्यामुळे सुनीलचे गुप्तांग मोठ्या प्रमाणावर भाजले. यानंतर आरोपी पत्नीने तेथून पळ काढला. वेदनेने त्रस्त झालेल्या सुनीलने मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी सुनीलला उपचारासाठी दाखल केले व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुसरीकडे, पतीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर पत्नी फरार झाली आहे.”

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close