हटके

क्षणिक सुखासाठी तरूण वर्गा कडून पालकांच्या अपेक्षावर फिरवलं जातंय पाणी.

Spread the love

युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज.

घाटंजी तालुका प्रतिनिधी
युवक वर्ग हा देशाचा कणा आहे.स्व प्रगती सोबत देशाची प्रगती समर्थपणे सांभाळत स्वतः च जीवन आत्मज्ञानानं भरून आपल्या माता-पित्यांच्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक युवक-युवतीच कर्तव्य आहे. पण, सध्याची वास्तविक स्थिती पाहता हे स्वप्न पुर्णत्वास नेऊन माता-पित्यांच मूलांप्रती असलेली स्वप्न अपेक्षा ह्या भंग होत असल्याचं भयावह चित्र दिसत आहे. काही बोटावर मोजता येतील इतकेच पाल्य आपल्या पालकांकडे व त्यांच्या आपल्या प्रती असलेल्या अपेक्षा,संस्कार या कडे जाणीवपुर्वक लक्ष देऊन झटतात. बहुतांश युवक-युवती मात्र शिक्षण,संस्कार,माणूसकीची जान न ठेवता केवळ अल्प क्षणिक सूखासाठी नको त्या वाममार्गाला जात असल्याचे चित्र घाटंजी तालुक्यात दिसून येतं आहे.घरच्यांला शाळा कॉलेज शिकवणी,टीवशन्स काल्स‌, कंपूटर कोर्स या नावावर घरून बाहेर‌पडलेली मुले इकडे नको ते काल्स,नको ते व्यसनात मदमस्त होऊन भर दिवसा गल्ली ,बोळात निर्जन स्थळी झाडाखाली गळ्यात गळा घालून दिसतात. तरून युवा पिढी तर आपल्या गरजा व मेंटेनन्स घरच्या पैशात भागत नसल्याने व्यसनाधीन मार्गावर आल्याचं विदारक चित्र आहे.पष्ट सांगायचे झाले तर,अल्पवयीन हवसी लफडी बाजामूळे व त्यांचे असभ्य चाळे आगणूकई मूळे सभ्य माणूस ही शरमेणी मान खाली टाकतो. यांना कोणी टोकत नाही असे नाही तर, उगाचं नसली झंझट कशाला शिवाय अल्पवयीन असल्याने बदनामी नको म्हणून‌ सामान्य मानुस मुगं गिळुन चूप राहतो. त्याचा परिणाम आता हे रोड रोमियो व क्षणिक लैला मजणूचे धाडस वाढत असून भर दिवसा मारावार लेआऊट,शनि मंदीर परिसर,आयटीच्या कॉलेज अंबा नगरी, व इतरही परिसरात हूंदडत असतात अशावर पोलिस कार्यवाही करून रोड रोमियो वर वचक लावण्यात यावी ही मागणी होत आहे. युवकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी मार्गदर्शन सोबत पालक वर्गाणी आपल्या पाल्यावर लक्ष देणे वेळोवेळी मार्गदर्शन करणे ही तितकीचं महत्वाचं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close