विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
प्री-प्रायव्हरीच्या निमांश ठाकरे या
विद्यार्थ्यांने साकारली लोकमान्य टिळक यांची वेशभूषा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
भारतीय असंतोषाचे जनक आणि कट्टर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये कारण्यात आली. कार्यक्रम शाळेचे संचालक राजेंद्र जोशी,प्राचार्य रवी देशमुख, उपप्राचार्य साई नीरजा आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य रवी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अण्णाभाऊ साठे यांनी समाजात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल प्रेरक शब्दांतून प्रबोधन केले. तर प्री प्रायमरी च्या प्रभारी गायत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित विविध कथा सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पायल टोणपे यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्यातील अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी प्री-प्रायमरी के.जी २ च्या निमांश ठाकरे यांनी साकारलेल्या लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेचे उपस्थितांनी आणि कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आकांक्षा तुपट यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.