आर्यनमॅन नंतर कॉम्रेड मॅरेथॉन, दक्षिण आफ्रिका स्पर्धेमध्ये अचलपुर तालुक्यातील स्वप्नील चिमोटे चे घवघावित यश
अंजनगाव (मनोहर मुरकुटे )
दक्षिण आफ्रिका मधील डर्बन येथे ११ जून रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अश्या आव्हानात्मक असलेल्या ८९ की. मी. कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन, धावण्याच्या स्पर्धेत शिंदी बु. येथील श्री स्वप्नील चिमोटे यांनी अवघ्या ९ तास ४८ मिनिट मध्ये पूर्ण करत The Robert Mtshali Medal 🏅 पटकावले .
कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन या अतिशय कठीण स्पर्धेत अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथील स्वप्नील चिमोटे सलग ८९ की.मी. धावून ९ तास ४८ मिनिटात यशस्वीपणे पूर्ण केले. या यशाबद्दल स्वप्निल चे सर्वत्र कौतुक होतं आहे.
जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी ही अल्ट्रा मॅरेथॉन शर्यत आहे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या पीटर्स मेरिटजबर्ग आणि डर्बन शहर मध्ये १९२१ वर्ष पासून आयोजित केली जाते. या स्पर्धेत ८९ कि. मी. अंतरामध्ये एकुण ११५० मीटर उंचीच्या १४ टेकड्या पार कराव्या लागतात. ही शर्यत 12 तासांच्या आत पूर्ण करायची असते या स्पर्धेदरम्यान सहा कट ऑफ दिलेले आहेत कट ऑफ टाइमिंग नंतर एखाद्या ठराविक ठिकाणी पोहोचल्यास पुढे जाण्याची परवानगी नसते.
मागील वर्षी स्वप्नील ने कझाकस्तान देश मधील नुर सुलतान येथे १४ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न म्यान हया अतिशय कठीण स्पर्धा दैदिप्यमान यश मिळविले होते…
स्वप्नील चिमोटे हा अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथील डॉ. सुभाषचंद्र चिमोटे व डॉ. सौ. सुनीता चिमोटे यांचा मुलगा आहे. त्याला पुणे येथील रनहोलिक्स ग्रुपचे प्रशिक्षक डॉ. योगेश सातव यांचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नील चिमोटे हा रनिंगचा सराव मागील ७ वर्षांपासून करीत आहे स्वप्नील चिमोटे पुणे येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून तो एनव्हीडीआय ग्राफिक्स पुणे येथे संगणक अभियंता म्हणून काम करीत आहे. त्याच्या यशाचे श्रेय तो नियमित सराव, प्रशिक्षक डॉ. योगेश सातव व आई वडीलांना देतो. स्वप्नील चिमोटे च्या या आतंरराष्ट्रीय यशाबद्दल त्याचे. अचलपुर पं स. मा सभापती देवेंद्र पेटकर.कृ. उ. बा. समिती संचालक गोपाल लहाणे. अणिल सांगोळे.विलासराव गाडगे. अणिल ताथोड. मंगेश सांगोळे.डॉ जितेंद्र मसने. राहुल मसने. हरिष पेटकर. मयुर लहाने. राहुल गाठे. यांनी अभिनंदन केले आहे.