हटके

छापखान्यातून 500 रु च्या RBI मष्ये पोहचण्यापूर्वीच लंपास 

Spread the love

नोटांची किंमत  अठ्ठ्याऐंशी हजार बत्तीस कोटी पन्नास लाख रुपये 

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                      नाशिक ,देवास आणि बंगळुरू च्या छापखाण्यात छपाई करण्यात आलेल्या 500 रु च्या अठ्ठाऐंशी हजार बत्तीस कोटी पन्नास लक्ष रुपये  रिजर्व्ह बँकेत पोहनच्यापूर्वीच लंपास झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक बाब समोर आली आहे. 

, या कालावधीत रघुराम राजन हे गव्हर्नर होते; पण त्या नोटांवर स्वाक्षरी कोणाच्या होत्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गायब झालेल्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या असून, त्याचे मूल्य अठ्ठ्याऐंशी हजार बत्तीस कोटी पन्नास लाख रुपये (8,80,32,50,00,000) इतके आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी 7 हजार 260 दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्या असल्याचे खुद्द रिझर्व्ह बँकेनेच उघड केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

करन्सी नोट प्रेस नाशिक, बँक नोट प्रेस देवास आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रांक प्रा. लिमिटेड बंगळूर येथील करन्सी नोट छापखान्यांतून भारतीय रिझर्व्ह बँक नोटा खरेदी करते. खरेदी केलेल्या नोटांचे या बँकेकडून देशभर वितरण केले जाते.
नाशिक करन्सी प्रेसमधून एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीत 500 रुपयांच्या 210 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठविल्या होत्या. एप्रिल 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीत 345 दशलक्ष, तर एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 1 हजार 662 दशलक्ष नोटा पाठविल्या होत्या.

बंगळूर प्रेसमधून याच कालावधीत 5,195.65 दशलक्ष आणि देवासकडून 1,953 दशलक्ष नोटा, अशा एकूण 8,810.65 दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला पाठविल्या असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन एस. रॉय यांना कळवले आहे. मात्र, यापैकी केवळ 7,260 दशलक्ष नोटा मिळाल्या असल्याचे रिझर्व्ह बँकेने 2016-17 च्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यावरून एकूण 1,760.65 दशलक्ष नोटा गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या नोटा गेल्या कुठे, इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी नोटा चलनात असताना आतापर्यंत कोणालाही समजले कसे नाही, असे प्रश्न उपस्थित होत असून, जबाबदार अधिकारी अजूनही मोकाट असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वसुलीसाठी पुन्हा नोटाबंदी करणार का?

1994 मध्ये 500, तर 2000 मध्ये 1 हजार रुपयांची नोट चलनात आली. सोळा वर्षे या दोन्ही नोटा व्यवहारात होत्या. मात्र, नोटाबंदीनंतर या दोन्ही प्रकारच्या सुमारे 15.3 लाख कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. त्यामुळे नवीन डिझाईनच्या अब्जावधी रुपयांच्या नोटा एकाच वर्षात कुठे गायब झाल्या आहेत, त्या वसूल करण्यासाठी पुन्हा नोटाबंदी करणार का, असा प्रश्न अर्थतज्ज्ञांना पडला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close