अकोला जिल्ह्यात प्रहारला मोठा हादरा जिल्हा पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्षाचा वंचितमधे प्रवेश.
अकोला / पुर्णाजी खोडके
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी. जि. प. सभापती सौ. गावंडे यांचे पती तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोट तालुकाप्रमुख तुषार पाचकोर तसेच प्रहार शेतकरी आघाडी चे संजय बुध यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज दिनांक 15 जून 2023 रोजी श्रध्देय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यालय मुंबई येथे जाहिर प्रवेश केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख अकोट तुषार पाचकोर तसेच जिल्हा अध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय बुध, ग्रा. पं. लोतखेळ उपसरपंच विशाल नागरे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे विचार प्रत्येक बहुजन कुटुंबातील सदस्यांपर्यत पोहचवणार असुन आगामी सर्व निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जवाबदारी स्विकारू असे वचन ह्या प्रवेशाच्या वेळी दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा ओबीसी नेते एडवोकेट संतोष रहाटे, बंटी पाटील गावंडे, हिरा सरकटे व सचिन सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.