सामाजिक

एनईपी अंमलबजावणी करिता धावपळ- मात्र विद्यापीठाकडून अद्याप अभ्यासक्रम तयार नाहीत.

Spread the love

*पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘एनईपी’ ची अंमलबजावणी करावी – डाॅ.बबन मेश्राम यांची मागणी

गोंदिया – इयत्ता बारावीचा निकाल
लागला असून प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत विद्यापीठाकडून अद्याप अभ्यासक्रम तयार झालेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या (national education policy -NEP) अंमलबजावणीची घाई न करता पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘एनईपी’ ची अंमलबजावणी करावी,असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा एन.एम.डी महाविद्यालय गोंदिया चे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बबन मेश्राम यांनी नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यांच्या उच्च शिक्षण विभागाने विविध अध्यादेश प्रसिद्ध केलेत त्यासंदर्भात मत व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्ष प्रवेश द्यावेत, असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी मेजर व मायनर विषय कसे असतील? या संदर्भातील अभ्यासक्रम आराखडा सुद्धा विद्यापीठाने तयार करुन केवळ क्रेडिट तयार केले असले तरी समजण्याच्या पलीकडे कडे आहे. नुकत्याच अभ्यास मंडळाचे बैठकीत चर्चा करण्यात आली.मात्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांनी नवख्या नवनिर्वाचित तसेच बिनविरोध निवडून आलेल्या किंवा आपल्या संघटनेचे विरोधात निवडून आलेल्या सदस्यांना विचारात न घेता अध्यक्ष यांनी आपल्या मर्जीतील सदस्य यांना घेऊन NEP20 नुसार अभ्यासक्रम तयार करण्यात व्यस्त असले तर या सत्रात उपयोगी होईल याबाबत शंका आहे.मात्र, विद्यार्थ्यांना जो अभ्यासक्रम शिकवायचा आहे तो अभ्यासक्रमाच अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत घाई करू नये. पूर्ण तयारी झाल्यानंतरच पुढील शैक्षणिक वर्षापासून एनईपी अंमलबजावणीला सुरुवात करावी, अशी भूमिका प्राध्यापक संघटनेतर्फे विद्यापीठांसमोर मांडणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने विविध अध्यादेश प्रसिद्ध केले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करावी, याबाबत प्राचार्य व प्राध्यापकांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. प्राध्यापकांच्या वर्क लोड संदर्भात अद्याप स्पष्टता आलेली नाही. एनईपी ची अंमलबजावणी कशी करणार याची माहिती प्राध्यापकांना असल्याशिवाय ते विद्यार्थ्यांना समजून सांगू शकणार नाहीत. त्यातच अद्याप अभ्यासक्रमच तयार झालेले नाहीत. विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची घाई केल्याने विद्यार्थ्यांचे व शैक्षणिक व्यवस्थेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे एका वर्षानंतर एनईपी ला सामोरे जावे, अशी भूमिका संबंधित विद्यार्थी व पालकाशी वार्तालाप करताना डॉ.बबन मेश्राम यांनी मांडली
दरम्यान, प्राचार्य संघटनेमध्ये सुद्धा याबाबत अस्वस्थता आहे.त्यामुळे एनईपी च्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीवर प्राचार्य संघटनेत चर्चा केली जाणार काय ?
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राध्यापकाची मानसिकता तयार झाली पाहिजे. मात्र, विद्यार्थ्यांसह,पालक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थांचालक व शिक्षकेतर कर्मचारी या कोणालाही एनईपी याबाबत मार्गदर्शन केलेले नाही.त्यामुळे चालू वर्षांपासून एनईपी ची अंमलबजावणी होईल किंवा नाही याबाबत शंका आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध परिपत्रक काढले जात असले तरी प्रथम वर्षात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याला कोणता अभ्यासक्रम शिकायचा आहे, याबाबत त्याला कोणतीही कल्पना देता येणार नाही.कारण अद्याप अभ्यासक्रमाचा आराखडा तयार झालेले नाहीत.झाले असेल तरी ते प्राचार्य,प्राध्यापक, विद्यार्थी,पालक यांचें पर्यंत पोहचलेच नाही.त्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे.अशा संभ्रम अवस्थेतील गोंधळामुळे अद्याप महाविद्यालयांना प्रवेशाचे प्रॉस्पेक्ट्स तयार करता आले नाहीत. केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचेच नाही तर राज्यातील बहुतेक विद्यापीठांचे अभ्यासक्रम अद्याप तयार झाले नाहीत हि शोकांतिका आहे. * *विद्यापीठ शिक्षण मंचाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाली सह महत्वाची भूमिका*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेवर विद्यापीठ शिक्षण मंचाचे संपूर्ण उमेदवार अविरोध निवडून येणारच विद्यापीठाच्या इतिहासात आजमितीस पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने शिक्षण मंचाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असले तरी विद्यार्थी व प्राध्यापक, पालक यांचेकरीता , NEP 20 अंमलबजावणीत महत्वाची भूमिका ठरणार आहे. विद्यापीठ अधिसभा आणि विधीसभा या दोहोंमध्येही विद्यापीठ शिक्षण मंच , अ.भा.वि.परिषद यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांचा पराभव करून निवडणूकीत धुव्वा उडविला होता हे विशेष.त्यामुळे शिक्षण मंचाचे सर्व प्राधिकरणात निवडून आलेल्या उमेद्वारांचे संख्याबळ भक्कम आहे.त्यातही नामनिर्देशित व नामित उमेद्वारांमधेही मंचानेच बाजी मारली होती.
विद्यापीठाने विविध प्राधिकरणावर निवडणूकीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील अत्यल्प प्रमाणात निवडून आलेल्या सदस्यांनी प्राधिकरण निवडणूकीसाठी अर्ज केले होते. विद्यापीठ शिक्षण मंचाकडे बहुमत असल्याने महाविकास आघाडीतील सर्व
अर्ज केलेल्या उमेद्वारांनी आपले सर्व प्राधिकरणावरील अर्ज मागे घेऊन शिक्षण मंचाला अविरोध निवडून दिले. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण मंचाने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे.विद्यापीठाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असल्याचे अनेक तज्ज्ञ मान्य करतात.
तेव्हा एनईपी नुसार अभ्यासक्रमांचा प्रारुप आराखडा संदर्भात महाविद्यालय, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.ऐवढेच नव्हे तर जनसामान्यांच्या मनात नाराजी दिसून येत आहे.तेव्हा विद्यापीठ शिक्षण मंच काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close