क्राइम

जावयाच्या खुनी गवसला आणि खुना मागील कारण आले समोर

Spread the love
पिंपरी / नवप्रहार न्यूज नेटवर्क
                    पुण्याच्या मावळ परिसरात पत्नी बरोबर शेतात गेलेल्या जावयाच्या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात एक वेगळाच प्रकार समोर आलं आहे. जावयाची हत्या अज्ञात मारेकऱ्यांनी नव्हे तर पत्नीनेच केल्याचे उघड झाले आहे. पती पत्नीला त्रास देत असल्यानेच तिने त्याच्या गळ्यावर सूरी चालवून त्याचा खून केल्याचे कबूल केले आहे .  अंकिता सुरज काळभोर असे पतीचा खून केलेल्या पत्नीचे नाव असून सूरज काळभोर असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पती अंकिताचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. अंकिताला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड राग येत होता. त्या रागातूनच तिने पतीचा काटा काढला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकिता हिचा पती तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. शनिवारी रात्री ही सुरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. मग ती चांगलीच संतापली, या त्रासाला कंटाळून तीने पतीला संपवायचं ठरवलं. यासाठी रविवारी सकाळी अंकिताने पतीला माहेरी म्हणजे गहुंजेला न्ह्यायचं ठरवलं. तत्पूर्वी घरातील चाकू तिने सोबत घेतला.

पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीतील सुरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शनही घेतलं. मग दुपारी गहूंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. तिथं पोहचल्यावर अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा केला. थोडं नजरेआड जाऊन तिने पतीवर नजर ठेवली. पती बेसावध असल्याची खात्री केली अन सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. दबक्या पावलाने पती जवळ जाऊन तिने मागून चाकूने गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पतीचा मृत्यू झाला. अशी माहिती अंकिताकडे केलेल्या चौकशीत समोर आलेली आहे.
आधी अंकिताने ही हत्या चार ते पाच अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला होता. मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला आणि उलट तपासणी करतच पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी पत्नीला अटक केलेली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनाचा उलगडा केला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close