क्राइम

बोदेगाव गॅस सिलेंडर चोरी प्रकरण, आणखी 169 गॅस सिलेंडर ताब्यात, दारव्हा पोलीसांची कामगिरी

Spread the love

प्रतिनिधी / दारव्हा

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणात दारव्हा पोलिसांनी आरोपीं कडून चौकशी दरम्यान महत्वाची माहिती काढून आणखी 169 नग रिकामे सिलेंडर हस्तगत केले आहे.

दि.5 डिसेंबर रोजी दारव्हा पोलिसांनी  बोदेगाव येथील इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर चोरी प्रकरणात  गुन्हा दाखल करुन हिंगोली जिल्हयातुन दोन आरोपीतांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन 120 नग रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपीतांचा दोन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला होता.

यादरम्यान पोलीसांनी आरोपीतांना विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता, यातील काही गॅस सिलेंडर हिंगोली जिल्हयातल्या कळमनुरी तालुक्यातील दिग्रस गावातील शिवारात एका शेतात ठेवले असल्याची माहीती आरोपीतांनी दिली.

पोलीसांनी क्षणाचाही वेळ न लावता पोउपनि शिवशंकर कायंदे, पोहेकॉ. महेंद्र भुते ब.क्र. 142, पोहेकॉ. सोहेल मिर्झा यांचे पथक हिंगोली जिल्हयात रवाना केले. आरोपीतांनी सांगीतलेल्या ठीकाणी काल दिनांक 13/12/2024 चे रात्रीच शोध घेतला असता, एका शेतात आणखी 169 नग रिकामे इंडियण कंपनीचे गॅस सिलेंडर मिळुन आले. त्याची शहानिशा केली असता, सदरचे सिलेंडर हे बालाजी गणपत जगताप वय अं. 23 वर्षे, रा. गणपुर ता. अर्धापुर जि. नांदेड याने तेथे आणुन ठेवल्याचे समजले. बालाजी जगताप याचा त्याचे राहते घरी व आजुबाजुचे परीसरात शोध घेतला असता, मिळुन आला नाही. पोलीसांना मिळुन आलेले सिलेंडर जप्त करुन दारव्हा पोलीस स्टेशनला आणले. उर्वरीत गॅस सिलेंडर व आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, मा. श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक मा. श्री पियुष जगताप, सहा, पोलीस अधिक्षक मा. श्री चिलुमुला रजनीकांत (दारव्हा), पोलीस निरीक्षक, श्री विलास कुलकर्णी (ठाणेदार) पोलीस स्टेशन दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवशंकर कायंदे, पोहेकॉ. महेंद्र भुते ब.क्र. 142 व पोहेकॉ. सोहेल मिर्झा यांनी यशस्वरित्या केली.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close