राजकिय

एकीकडे विरोधी पक्षांची एकत्र येण्याची तयारी तर भाजपा ही अलायन्स मोड वर 

Spread the love

नवी दिल्ली / पी संजू

                     देशभरातील भाजपा विरोधी पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढण्याची तयारी चालविली आहे. काहीं राज्यात भाजपा सोबत असलेल्या पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे. आगामी निवडणुका पाहता 2024 सर करण्यासाठी भाजपा ने देखील कंबर कसली असून प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती आखली असल्याचे त्यांच्या हालचालींवरून दिसून येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सायंकाळी आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. नायडू यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. जवळपास १ तास झालेल्या या चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर दोन्ही पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, टीडीपीच्या नेत्यांनी या भेटीवर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, भाजप सत्तेत येताच टीडीपीने 2018 मध्ये एनडीए सोडली. तर, आता पक्षाने अनेकवेळा भाजपसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आहे. ते जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा मजबूत करत आहेत. देशाला बळकट करण्याच्या या मार्गावर मला पंतप्रधान मोदींसोबत काम करायचे आहे, असे एकदा नायडू म्हणाले होते. 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने नायडू केंद्रावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी एनडीएशी संबंध तोडले होते. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष करण्यात आले, यामुळे युती तोडत असल्याचे कारण नायडू यांनी दिले होते.

काय होईल…
दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्यास भाजप आंध्र प्रदेशसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाय पसरवू शकतो. तेलंगणात विरोधी पक्ष म्हणून टीडीपी मजबूत आहे. टीडीपी आंध्र प्रदेशात उच्चवर्णीयांच्या पाठिंब्यासाठी संघर्ष करत आहे, भाजपामुळे हा गट टीडीपीला मिळेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close