सामाजिक

उमरेड उपविभागात 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी

जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील गावातील 49 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 6 जूनपर्यंत मागविण्यात आले आहे.
सरळ भर्ती प्रक्रियेत आरक्षणाचा प्रवर्ग अदलाबदलीनुसार खुल्या प्रवर्गासाठी 18, इतर मागास प्रवर्ग-17, भटक्या जमाती (ब)- 9, विमुक्त जाती (अ)-4 आणि, भटक्या जमाती क व ड-1 असे एकूण 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज www.sdoumredpp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत एकूण पदापैकी 18 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 6 जून 2023 पर्यंत आहे.
सालई (ब्राम्हण), चाडा, दिपाळा, पौनी, पिराया, निरव्हा, भिवापूर (उटी), भिवी, लोहारा, धानला, डोंगरगाव, डोडमा, माळणी, जुनोनी, मानोरी, पेंढरी, कळमना (बेला), हिवरा, सावरगाव-नेरी पुनर्वसन, खलासना, धानोली, सावळी, खैरलांजी, चिचघाट, पंचखेडी, अंबाडी, चिपडी, टाकळी, अकोला, पिपळा, किन्हाळा, वडेगाव काळे, लांजाळा, धामनी, अजनी, तेलकवडसी, बोटेझरी, मांगरुड(लभान), मांडवा, झिलबोडी, मेंढेगाव, रुयाड, अडेगाव, खापरी (कुरडकर), दुधा, पेंढरी, खातखेडा व धामना अशा 49 गावांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, उमरेड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close