क्राइम

शांत समजल्या जाणाऱ्या भंडारा शहरात खुनाच्या घटनेने खळबळ

Spread the love
जमावाच्या बेदम मारहाणीत  आरोपीचा देखील मृत्यू 
भंडारा / प्रतिनिधी
           शांत शहर आणि जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहर खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे,. खून झालेला व्यक्ती हा लस्सी विक्रेता होता. यात आरोपीला उपस्थित जमावाकडून झालेल्या मारहाणीत उपचारा दरम्यान नागपूर येथे आज सकाळी त्याचा  मृत्यू झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
                        पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील गांधी चौक येथील आदर्श टॉकीज जवळ दुर्गा लस्सी सेंटर चालवणाऱ्या  अमन नांदूरकर याचे त्याच्या दुकांनात आलेल्या विक्की मोगरे आणि विष्णू नामक तरुणाशी शुल्लक कारणावरून वाद झाला.  वाद झाल्यानंतर विक्की हा तेथून निघून गेला आणि काही वेळाने अभिषेक साठवणे वआपल्या काही साथीदारांना घेऊन अमन याच्या लस्सी सेंटर मध्ये आला .आणि पुन्हा अमन शी वाद घालू लागला. दरम्यान अभिषेक ने  अमन च्या पोटावर चाकूने वार केले.
                     ही बाब अमन च्या काही मित्रांना आणि साथीदारांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळा कडे धाव घेऊन अभिषेक आणि त्याच्या साथीदारांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर जखमी अमन आणि अभिषेक याला  जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
– डॉक्टरांनी अमन याला मृत घोषित करताच अभिषेक ला दवाखान्यातच मारहाण –  अमन ला तपासल्या नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . अमन च्या मृत्यूबद्दल समजताच संतापलेल्या अमन च्या साथीदारांनी अभिषेक याला रुग्णालयातच मारहाण करम्यास सुरवात केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला .
नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये उपचारा दरम्यान  अभिषेक चा मृत्यू – आरोपी अभिषेक ची गंभीर प्रकृती पाहता त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात माजली होती धावपळ – अमन च्या मृत्यू बद्दल समजताच संतापलेल्या अमन च्या मित्रांनी त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या अभिषेक ला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉक्टर आणि परिचारिका यांनी स्वतःला वाचविण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घेतली. सुरक्षा रक्षकला देखील तेथून पळून जावे लागले.
कर्तव्यदक्ष एसपी घटनास्थळी दाखल – या प्रकारणाबद्दल समजताच एसपी लोहित मतांनी  आणि ठाणेदार बारसे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close