श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची निकालात गरुडझेप

नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी /
सालोड कसबा : राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा संचालित श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 95.34 टक्के लागला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 43 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 6 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये, 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये व 23 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. मोनिका इंगळकर हिने 84.67टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला. कावेरी ठाकरे हीने 80.50 टक्के गुण मिळवून द्वितीय, देवयानी मुधोळकर 80.17टक्के गुण मिळवून तृतीय, दिक्षा बसवनाथे हीने 79.50 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर ओम नेवारे याने 77.83 टक्के गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर, सचिव क्षितीजदादा अभ्यंकर, सहसचिव प्राचार्य गजानन वानखडे,माजी प्राचार्य सतीश पुंडकर, प्रकाशपाटील इंझळकर, सरपंचा रोषनाताई ढगे, रमेश ठाकरे ,सुनील इंझळकर,जगदीश ढगे, हन्नानभाई, अक्रम भाई, प्रमोद इंझळकर, निलेशआप्पा मुधोळकर, मोबीन भाई, सतीश इंझळकर, अनिल राऊत यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश पवार,प्रा. अनिल गवई,प्रा.वैशाली राहाटे, प्रा. मोहिनी माकोडे, प्रा.मोनू सरदार व इतर शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात