खोडगाव येथे तीन ते चार किलो सोने व लाखो रुपयांचा चलणी नोटा सापडल्याची चर्चा !
पोलिसांची उडवा उडविची उत्तरे
अंजनगांव सुर्जी (मनोहर मुरकुटे )
काल दिनांक 17 ला अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथे रात्री अंजनगाव पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन ते चार किलो सोन्यासह लाखो रुपयाचे चलनी नोटा सापडल्याची चर्चा संपूर्ण अंजनगाव तालुक्यातील परिसरामध्ये पसरली आहे. यासंदर्भात मात्र अंजनगाव पोलिसांनी उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांवरील संशय वाढला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 18ला सकाळपासून अंजनगाव सुर्जी शहरात एकाच चर्चेला पेव फुटल्याने, खोडगाव येथील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांनी झडती घेत असताना त्यांच्या घरामधून तीन ते चार किलो सोन्याचे दागिने लाखो रुपयांचा एक पोतभर नोटा असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अंजनगाव पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला नेले असल्याचीही चर्चा तालुक्यात असून या संदर्भात अंजनगाव पोलिसांना माहिती मागितली असता पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. आणि माहिती देत असताना उडवा उडविची उत्तरे दिली. जर खोडगाव येथे तीन ते चार किलो सोने सापडले असेल तर यावर अंजनगाव पोलीस गप्प का ? असा प्रश्न निर्माण होत असुन पोलिसांच्या उत्तरामुळे खोडगाव येथील घडलेल्या घटनेवर नागरिक शिक्कामोर्तब करित असुन या संदर्भात नेमके खरे काय ? व खोटे काय ? याची चौकशी जिल्हा पोलिस प्रशासनाने करुन या गोष्टीचा उलगडा करण्याची मागणी तालुक्यातील नागरिक करित आहे.
**********************
या संदर्भात ठाणेदार दीपक वानखडे यांच्याशी संपर्क साधला असताना अशी कुठलीही घटना घडली नाही अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.