हटके

पत्नीने केली अशी Acting की नशेबाज पतीची नशाच उतरवली

Spread the love

आग्रा / नवप्रहार न्यूज नेटवर्क

           दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्ती कडून दारू ढोसल्यावर पत्नीला अर्वाच्य शब्दात शिवीगाळ आणि मारझोड हा काही नवीन विषय नाही.” दारुड्याच्या या सवयीमुळे अनेक संसार उध्वस्त होतात. पण यावर एका महिलेने जी शक्कल लढवली ती ऐकून तुम्हीही महिलेचे कौतुक कराल

आपसी वादानंतर पती-पत्नी काउंसेलिंगसाठी गेले होते. तेव्हा पती-पत्नीने एकमेकांवर दारोडे असण्याचा आरोप केला होता. पतीचा आरोप आहे की, पत्नी दारू पिते. दारू पिऊन त्याला शिव्या देते आणि भर चौकात धिंगाणा घालते.

पुरावा म्हणून त्याने काउंसेलरला व्हिडीओ सुद्धा दाखवला. व्हिडिओत पती घाबरून पळत होता आणि पत्नी त्याला शिव्या देत होती. पतीने जेव्हा त्याची बाजू मांडली तेव्हा पत्नीने तिचं म्हणणं सांगितलं. पत्नीने सांगितलं की, पती रोज दारू पिऊन घरी येत होता. घरी येताच नवनवीन कारणांनी तिला मारहाण करत होता. तिला त्रास देत होता.

रोजरोजच्या मारहाणीला कंटाळून तिने दारू पिल्याची अ‍ॅक्टिंग केली. पतीला त्याच्याच भाषेत धडा शिकवणं सुरू केलं. पत्नीनुसार ती कधीच दारू प्यायली नाही. पण पतीची नशा उतरवण्यासाठी तिला दारू प्यायल्याची अ‍ॅक्टिंग करावी लागली. दोघांचीही बाजू ऐकल्यानंतर काउंसेलर यांनी दोघांमध्ये एक लिखित करार केला.

पतीला सांगण्यात आलं आहे की, त्याने दारू पिऊ नये. पतीने हे लिहून दिलं की, तो केवळ आठवड्यातून एकदाच दारू पिणार. पत्नीला मारहाण करणार नाही. लिखित करार झाल्यानंतर पती-पत्नी एकत्र घरी गेले. पती-पत्नीच्या या वादाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close