सामाजिक

पोहण्यासाठी गेलेल्या 9 मुली बुडाल्या 7 मुलींना वाचविण्यात यश 

Spread the love
 

खडकवासला / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                  रखरखत्या उन्हात पाणी पाहिल्यावर पाण्यात उतरण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. मग तो वृद्ध असो अथवा किशोरवयीन. तलावात पोहण्यासाठी आलेल्या मुलींपैकी गावकऱ्यांच्या प्रसंगवधनामुळे 7 मुलींना वाचवण्यात आले असून 2 मुलींचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटना गोऱ्हेखुर्द (ता.हवेली ) हद्दीतील धरणात घडली आहे. 

हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊस जवळ काही मुली आल्या होत्या. आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. 

पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. पण त्याच ठिकाणी काही स्थानिकही तिथे होते. मुलींची मदतचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले पण सोळा ते सतरा वर्षांच्या दोन मुलींचा शोध लागला नाही.

स्थानिकांनी या घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच खडकवासलाचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवालदार दिनेश कोळेकरांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close