सामाजिक

पत्रकार परिषदेतून शहरातील सीताबाई संघई शाळेवर गंभीर आरोप

Spread the love

 

सीताबाई संगई शाळेचे अल्पसंख्यांक प्रमाण पत्र खोटे असल्याचा तक्रारकर्ते यांचाआरोप*

.
कुशल चोधरी याची पत्रकार परिषदेत माहिती

अंजनगाव सर्जी …ता प्रा.
सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मिळालेले अल्पसंख्यांकाचे प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप येथील नागरिक कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला असून शासनाने सदर शिक्षण संस्थेच्या कारभाराची कसून चौकशी करण्याची मागणी त्यानी केली आहे.
स्थानिक सीताबाई संगई संस्थेच्या व्यवहारामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे प्रकार असल्याचा आरोप कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांसमोर केला असून यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष व सचिव यांना वेळोवेळी तक्रारकर्ते कुशल चौधरी यांनी माहितीच्या अधिकारात अल्पसंख्यांक प्रमाण पत्राची माहीती शाळेला मागीतली तरी ही शाळेनी त्याबाबत माहीती दिली नाही तसेच दि२४ मार्च 23 पत्र देऊन शाळेबदल असलेले एकूण ३० प्रकारचे माहीतीचे खुलासे मागीतले तरीही सदर
संस्थेनी दि२१/४/२०२३ पर्यत कोणतीच माहीती सादर केली नसल्याचे कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शाळेबदल असलेल्या तक्रारीची माहिती सदर संस्था देण्यास टाळाटाळ करीत असल्याने सदर संस्थेमधील संस्थेमधील घोळा बाबत मोठ्या प्रमाणात संशय निर्माण झाला असून सदर संस्थेची चौकशी शासनाने करणे अतिशय गरजेचे असल्याचे पत्रकार परिषदेत कुशल चौधरी यांनी म्हटले असून अल्पसंख्याक च्या नावाखाली शासनाची , विधार्थी व, पालकांची खुलेआम लूट करीत असल्याची लेखी तक्रार आपण शासनाकडे केली असल्याचे कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शाळेजवळ अल्पसंख्यांक दर्जाचे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र नसल्याचा खळबळ जनक आरोप तक्रार कर्ते कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ह्याबाबत जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय अमरावती याचे जावक क्र ५६८९. . जिप / शिअ / माध्य / २०२२ दि ७/११/२०२२ व दुसरा जावक क्रमांक जि प अ / शिक्षण / खा प्राशा /१३२३/१४/०२/२०२३ अन्वे पत्र व सीताबाई संगई अल्पसंख्यांक शाळा असून अल्पसंख्यांक सर्व शासन निर्णयाला वेशीवर टांगून तेथील संस्थाचालक मनमानी कारभार करत असल्याची आढळून आल्याचे व जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग यांनी शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्या बाबत असून सदर पत्रामध्ये शिक्षण विभागाकडून चौकशी समिती नेमण्यात आली व या चौकशी समितीने दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी अहवाल सादर केला या अहवालामध्ये शाळेतील प्रवेश प्रक्रिया बाबत खूप मोठा घोळ असून तसेच प्रवेश प्रक्रिये दरम्यान पन्नास टक्के धार्मिक अल्पसंख्यांक व प्रवर्गाची विद्यार्थी प्राप्त न झाल्याने खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यासाठी परवानगीसाठी माननीय अध्यक्ष अल्पसंख्याक मुंबई यांच्याकडे कार्यालयास पत्र पाठविले आहे असे मुख्याध्यापक यानी म्हटले आहे. परंतु सदर प्रकरणात अल्पसंख्यांक आयोग मुंबई यांच्याकडे 2009 पासून आज पर्यंत अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शाळेनी पत्रव्यवहार केला नाही ही अधिकृत माहिती माहिती अधिकारा मार्फत मिळाली असून शाळेकडून मुख्याध्यापक तक्रार कर्त्याला माहितीच्या अधिकारात खोटी माहिती देतात असा आरोप तक्रार कर्ते कुशल चौधरी यांनी केला असून तसेच शाळे कडून शिक्षक पालक संघाच्या सभेत इयत्ता पहिलीच्या पालकाकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेण्याचा प्रकार निर्देशनात आल्याचे व शासन मान्यता प्राप्त संस्था असून व शंभर टक्के अनुदान असतांना शाळेत पालकाकडून घेण्यात येणारी फी कशासाठी त्यामुळे सदर प्रकरणी शासन मान्यतेच्या अटी व शर्तीचा भंग शाळा मुख्याध्यापक व संस्थेचे संचालक मंडळ करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत कुशल चौधरी यांनी केला आहे, तसेच सदर प्रकरणी शाळेच्या पिटीए खात्यातील मागील जमा रक्कम वसूल पात्र ठरून शासन नियमानुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात येत आहे असा अहवाल चौकशी समितीने शिक्षण विभागाकडे दाखल केला असून सदर अहवालाच्या सत्यप्रती पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर कुशल चौधरी यांनी पत्रकारांना सादर केल्यात यामुळे संस्थेचाअल्पसंख्यांक दर्जा रद्द होऊ शकते काय असा प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्र शासनाने सदर शिक्षण संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तक्रार कर्ते कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली असून शासनाने सदर शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी शासनाकडे केली असल्याचे सांगितले.
तसेच सदर शिक्षण संस्थेने कित्येक वर्ष जुना असलेला लोकांचा जाण्या येण्याचा रस्ता सुद्धा बंद केला असल्याचे पत्रकार परिषदेत चौधरी सांगून शासनाकडून मागासवर्गीय वस्तीगृहाच्या नावाखाली मिळालेल्या जागेचा सदर शिक्षण संस्थेनी गैरवापर केला असून त्या ठिकाणी मागासवर्गीयांचे वस्तीगृह न बांधता खाजगी शाळा उभी केल्याचा गंभीर आरोप कुशल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.,मला ह्याबाबत न्याय न मिळाल्यास मी उच्च न्यायालयात दाद मागणार असे तक्रारदार यांनी सांगितले

*बॉक्स*
सीताबाई संगई शिक्षण संस्थेबाबत तक्रार कर्ते कुशल चौधरी यांनी केलेल्या गंभीर आरोपाबद्दल सदर शिक्षण संस्थेचे काय म्हणणे आहे याबाबत एक रीतसर पत्र पावर ऑफ मीडियाच्या वतीने दिनांक ४/ ५/ २०२३ रोजी देण्यात आले होते. त्यावर सीताबाई संगई शिक्षण संस्थेनी आमची शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने कार्य करीत असून संस्थेतील सर्व कार्य शासनाच्या नियमानुसार सुरू असल्याचे सीताबाई संगई हायस्कूल, सीताबाई संगई कन्या शाळा तसेच सीताबाई संगई प्राथमिक शाळेतील अध्यक्ष, सचिवानी माहीती न देता तिन्ही मुख्याध्यापकांनी ,एका पत्राद्वारे कळविले आहे.
विशेष म्हणजे ! तक्रारकर्त्याने सदर संस्थेवर पत्रकार परिषदेत जे गंभीर आरोप लावले त्याबद्दल कोणताही योग्य खुलासा संस्थेच्या वतीने देण्यात आला नाही.B त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले. ह्यावरून संस्थेवर संशय बळावला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close