शैक्षणिक
सी. बी. एस. ई दहावीच्या परिक्षेत नवोदय विद्यालय बेलोरा येथिल काव्यांजलीची भरारी
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये कु. काव्यांजली भास्कर वेट्टी ने 94% घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा यवतमाळ ची ती विद्यार्थीनी आहे. तीने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य श्री.धोपडे सर,व नवोदय विद्यालयाचे सर्व शिक्षक, प्राथमिक शिक्षिका सौ.भाग्यश्री कावळे मॅडम,यांचेसह आजोबा तानबाजी,आजी कमलाबाई,आई-बाबा कुसुम भास्कर वेट्टी, कलीराम काका, दत्ता काका स्नेहलकाकू,कल्पनाकाकू व सर्व शिक्षक,नातेवाईक, शुभचिंतक यांना देते. तिच्या यशाबद्दल पंचायत समिती घाटंजी चे विस्तार अधिकारी सुनिल बोंडे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. तीच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1