वादळी पावसाने आणले कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
अंजनगाव तालुक्यात वादळी पावसाने आधी गहू, नंतर कांदा पिकाचे नुकसान
हजारो एककर कांदा पिकांचे नुकसान.शासनाकडून शेतकरयांना मदतीची अपेक्षा
अंजनगाव सुर्ज़ी / मनोहर मुरकुटे
आधीच दरवर्षी सततच्या निसर्गाचे अवकृपेने शेतकरी हवालदिल झाला असतांना दरवर्षी काहींना काही संकट ह्या शेतकऱयांवर कोसळत आहे , त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही डबघाईस येत असताना आपली उपजीविका कशी पूर्ण करता येईल ही विवंचना शेतकऱयांची कायम असतांना ह्यावर्षी सुरुवातीला रब्बी पिकामधील सुरुवातीला गहू , ह्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले , त्यानंतर मोठ्या कष्टाने शेतकऱयांने कांदा पीक पेरले , असता कांदा पीक ऐन काढणीला येऊन शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची ठेवण केली असता गेली पंधरा दिवसापासून संपूर्ण विदर्भात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अंजनगाव तालुक्यात धुमाकूळ घातला ह्यामध्ये तालुक्यातील कांदा पीक पेरणार्या शेतकर्याचे कांदा पीक शेतमध्येच पूर्ण पणे नष्ट झाले, त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी हा पुन्हा आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे, ,शेतकऱ्याने कांदा ह्या पिकावर मेहनत करून कर्जबाजारी होऊन पीक उभे केले ,पिक आता थोड्याच दिवसात घरी येणार व आपली उपजीविका भागणार ह्या आशेवर असलेल्या कांदा पीक पेरणार्या शेतकर्यांचे स्वप्न धुळीस मिसळले, नवीन आशा पल्लवित होण्याचे मार्गावर असतांना अचानक झालेल्या वादळी पावसाने शेतकऱयांचे नुकसान केले ,अश्या परिस्थितीत शासनाने ह्या भागातील कांदा पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई दयावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे ह्यावर शासन शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल की केवळ शेतकर्यांचे तोंडाला पाने पुसेल हे येणाऱ्या काळात दिसेल असे दिसून येत आहे