क्राइम

अजबच ह…… ! त्याने घरातच सुरू केला होता ड्रग्स बनवण्याचा कारखाना

Spread the love

१० कोटीचा मुद्देमाल जप्त ; देश विदेशात विकल्या जायचे ड्रग्स

बेंगळुरू / नवप्रहार मीडिया

                    बेंगळुरू शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे अवैध रित्या राहत वास्तव्यास असलेल्या नायजेरीयन तरुणाला ड्रग्स विकताना सिसिबीच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याला विचारपूस केली असता त्याने पोलिसांना जे सांगितले ते ऐकून पोलीस देखील चक्रावले. तो घरीच ड्रग्स चां कारखाना चालवत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.पोलिसांनी घरातून १० कोटीचे ड्रग्स जप्त केले आहे. 

   या कारखान्यात सिंथेटिक औषधं तयार करून देश-विदेशात विकली जायची. बेंजामिन असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो मूळचा नायजेरियाचा रहिवासी आहे. या छाप्यात तब्बल १० कोटी रुपयांच्या एमडीएमए (सिंथेटिक ड्रग) सह, त्याच्या उत्पादनात वापरलं जाणारं रसायन, रासायनिक अ‍ॅसिड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

घरात छोटा कारखाना चालवायचा : आरोपी अवलहल्ली येथील त्याच्या घरी कच्चा माल वापरून प्रेशर कुकरमध्ये सिंथेटिक औषध तयार करत असे. हे औषध कर्नाटकाशिवाय इतर राज्यातही पुरवल्या जायचं. त्याला राममूर्ती नगर पोलीस ठाण्याच्या परिसरात १०० ग्रॅम एमडीएमएसह अमली पदार्थाची विक्री करताना अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता तो अवलहल्ली येथील आपल्या घरात औषधनिर्मितीचा छोटा कारखाना चालवत असल्याचं उघड झालं.

भारतात बेकादेशीर वास्तव्य होतं : आरोपी मर्चंट व्हिसावर भारतात आला होता. त्याच्या व्हिसाची मुदत २०२२ मध्येच संपली होती. २०२१ मध्ये त्यानं कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बेंगळुरूमध्ये घर भाड्यानं घेतलं होतं. त्याला यापूर्वी हैदराबादमध्येही अटक करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय. आरोपीकडून १० कोटी रुपये किमतीचे ५ किलो एमडीएमए, औषध बनवण्याचा कच्चा माल, ५ लिटरचा प्रेशर कुकर, स्टोव्ह, गॅस सिलिंडर, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध रामामूर्ती नगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा आणि विदेशी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत ताब्यात घेण्यात आल्याचं शहर पोलिस आयुक्तांनी सांगितलं

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close