भंडाऱ्यात आठ ठिकाणी आपला दवाखाना ची स्थापना
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील लोकार्पण
भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे घोषित हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाण्याचा शुभारंभ केल्या जात आहे. नगरपरिषद भंडारा व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थापित या दवाखान्याचे लोकार्पण १ मे महाराष्ट्रदिनी ऑनलाईन पद्धतीने आ. नरेंद्र भोंडेकर अध्यक्षतेत केल्या जाणार आहे. शहरातील आठ विविध ठिकानो शूर करण्यात येणाऱ्या दवाखान्यात दुपारी दोन ते रात्री 10:00 वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केली जाणार आहे.
उल्लेखनीय आहे कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भंडारा दौऱ्यातील जाहिर सभेत नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावे या करीत शहरातील प्रत्येक प्रभागात एक दवाखणा देण्याची घोषणा केली होती. याच घोषणेची पूर्तता करीता आ. नरेंद्र भोंडेकर यांनी शासन दरबारी तगादा लावून हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाण्याला मंजूरी मिळवून आणली. नगरपरिषद भंडारा व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भंडार शहरात आठ ठिकाणी या दवाखान्यांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील आठ वार्डात उभारण्यात आलेले दवाखाने निशा शाळेसमोरील समाज भवन चांदणी चौक, मेंढा नशिक नगर येथे विपीन पुरषोत्तम मेश्राम यांचे घरी, सुभाष वार्ड येथील शिवाजी पुतळा जवळ श्रीमती वंदना थोटे यांचे घरी, भगतसिंग वार्ड टाकळी येथील भगत सिंग शाळेत, तकीया वार्ड येथील साई मंदीरच्या मागे श्रीमती दुर्गा ब्रम्हचारी पडोळे यांचे घरी, खात रोड वरील दवाखाना राम नगर येथील योगेश्वर साकुरे यांचे घरी, डॉ.झााकीर हुसैन वार्ड पाणी टाकी जवळील शाळेची इमारत तथा रमाबाई आंबेडकर वार्ड श्रीमती सुकेशनी रमेश तिरपुडे यांच्या घरी हे दवाखाने उभारण्यात आले आहे. सदर दवाखान्यात संसर्गजन्य आजारावर विशेष तपासणी व औषध उपचार करण्यात येईल. तसेच बीपी, शुगर तपासणी, आंधळेपणा, मूकबधिरपणा, मानसिक आजार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कर्करोग (ओरल ब्रेस्ट सर्वाइकल कॅन्सर ) किशोरवयीन व वृद्धापकाळात उद्भवलेले आजार याबाबत सुद्धा औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार. तसेच सर्व प्रकारच्या सामान्य आजारावर हि मोफत औषधोपचार करण्यात येणार असून वरील सर्व सेवा या शासनाकडून मोफत देण्यात येतील. १ मे महाराष्ट्र दिनाचे अवचीत्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेत वरील सर्व दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शासनाच्या या आपला दवाखाण्याचा लाभ भंडारा शहरातील जनतेने घेण्याचे आवाहन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले आहे.