परतवाड्यात क्रिकेट सट्टा खेळण्यावर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांची धडक कार्यवाही
एक आरोपी ताब्यात तर दोन फरार
प्रतिनिधी. मुबीन शेख.
चांदुर बाजार
सद्या सुरू असलेल्या इंडीयन प्रिमियर लिग (आय.पी.एल.) क्रिकेटच्या सामान्यांवर पैश्यांची हार- -जीतचा सट्टा अमरावती ग्रामिण जिल्हयात कोठेही खेळला किंवा खेळविला जाणार नाही याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी आपले अधिनस्थ सर्व ठाणेदार व गुन्हे शाखा चे पथकास सुचना देवून आदेशित केलेले होते.
गुन्हे शाखेचे चे पथक दि. ३०/०४/२०२३ रोजी पो.स्टे. परतवाडा हद्दीत गस्त करित असतांना गुप्त माहीती मिळाली की, आरोपी नामे प्रतिक किशोरसिंह ठाकुर, वय २६ वर्ष, रा. परतवाडा हा त्यांचे अँन्ड्राईड मोबाईल व क्रिकेट सट्टयाचे अॅप व आय.डी. लिंक व्दारे पैश्याचे हारजीतवर सट्टा खेळीत आहे. प्राप्त माहीतीची शहानिश करून सदर आरोपीस गुन्हे शाखा चे पथकाने ताब्यात घेवुन तपासणी केली असता त्याचे मोबाईल मध्ये अॅप व
आय.डी. लिंक व्दारे तो क्रिकेट सट्टा खेळीत असतांना मिळुन आला.
सदर आरोपीस अधिक विचारपुस केली असता त्याने सदर अॅप व आय. डी. लिंक ही त्याला फरार आरोपी नामे संकेत शरद शेळके, वय २४ वर्ष, रा. परतवाडा व सिराज मेमन, रा. इतवारा बाजार, अमरावती यांनी उपलब्ध करून देली असुन त्यांचे सांगण्याप्रमाणे तो सट्टा चालवित असल्याचे सांगीतले. त्याचप्रमाणे सदर सट्टयाचा संपुर्ण हीशोब हा मुख्य सट्टा बुकी आरोपी सिराज मेमन, रा. इतवारा बाजार, अमरावती वाला देण्यात येत असल्याचे सांगीतले सदर आरोपी कडुन सट्टयासाठी वापरण्यात येणारा मोबाईल व नगदी असा एकुण ११,६००/- माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करित आहेत.
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात तपन कोल्हे. पो. नि. गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांचे नेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे पोलीस अमलदार युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, रविन्द्र व-हाडे यांनी केली.