नाफेडच्या चना खरेदीला पुन्हा सुरुवात आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची घेतली होती भेट
धामणगाव रेल्वे
गत आठवड्यात बंद करण्यात आलेली चना खरेदी आ प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.
यंदा नाफेडच्या वतीने ५ हजार ३३५ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने चना खरेदी सुरू करण्यात आली होती उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ही खरेदी गत आठवड्यात नाफेड ने बंद केली मात्र अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर ही चना खरेदी झाली नव्हती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमदार प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्षात भेट घेतली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पणन सचिव अनुप कुमार यांना फोनवरून सूचना केल्या व त्याच फोनवरून आ प्रताप अडसड यांचे सुद्धा सचिव अनुप कुमार यांच्याशी बोलणे करून दिले होते .तसेच केंद्र शासनाचे कृषी सचिव यांना सुद्धा आ. अडसड यांनी पत्र दिले होते.राज्य शासनाने केंद्र सरकारला याविषयी माहिती दिल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून चना खरेदी ला सुरुवात होणार आहे यापूर्वीच्या ज्या शेतकऱ्यांना चना खरेदी संदर्भात एसएमएस प्राप्त झाला होता त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आदेश उपसचिव सुनंदा घड्याळे यांनी काढले आहेत आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या चना खरेदीला सुरुवात होणार आहे त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानलेआहे