घोडसगाव येथील शेतकऱ्यांची राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या
अंजनगाव सुर्जी ता. प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली (रहिमापुर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडसगाव येथील सुरेंद्र साहेबराव राऊत या शेतकऱ्यांने नापिकी कर्जाच्या विवंचनेतून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी (दि.27) दुपारी 1.30 वाजता दरम्यान उघडकीस आली .
सुरेंद्र साहेबराव राऊत वय 51 वर्षीय
असे मुतक शेतकऱ्याचे नाव आहे.राऊत यांच्याकडे वडीलोपार्जीत 2 एकर कोरडवाहू शेती असून यावर्षी सोयाबीन,तुर पेरली होती.दरम्यान अतिवृष्टीमूळे सोयाबीन, तूर पिक मातीमोल झाले होते.तसेच सोसायटीचे कर्ज व ईतर देणी – घेणी व हाताला दुसरा रोजगार मीळत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते.मुतकाच्या पशचात वयोवृद्ध आई,पत्नी,दोन मुले व असा आप्त परीवार आहे. खल्लार पोलीस स्टेशन ला माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी मृत्यूदेह पंचनामा करून दर्यापूर येथे ग्रामीण रुग्णालय देण्यात आले . खल्लार पोलीसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.