पत्नीने पतीला गोड बातमी देण्यासाठी निवडली मेट्रो पण …
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
कधी तोकडे कपडे घालून तरुणीचा मेट्रोत डान्स, तर कधी कपल्स चे अश्लील चाळे, तर कधी प्रवषयांसमोरच हस्थमैथुन यामुळे मेट्रो नेहमी चर्चेत असते. आता तर एका पत्नीने आपल्या प्रेग्नंसी ची माहिती मेट्रोत दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
आता प्रेग्नंसी टेस्ट साठी स्त्रियांना डॉक्टरकडे जाण्याची आवशकता नाही.बाजारात अनेक प्रकारच्या किट्स उपलब्ध असून स्त्रीया घरी बसल्या बसल्याच टेस्ट करू शकतात.
प्रेग्नसी चाचणीसाठी बाजारात अनेक प्रकारचे किट उपलब्ध आहेत. स्त्रिया त्यांच्या सोयीनुसार घरीच गर्भधारणा चाचणी करतात आणि घरातच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदाची बातमी देतात.
पण एका महिलेने दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना तिच्या पतीला गरोदरपणाची गोड बातमी दिली. इतकंच नाही तर महिलेने या क्षणाचा व्हिडिओही बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
मेट्रोमध्ये महिलेने पतीला प्रेग्नेंसीची खुशखबर दिली
व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रोमध्ये प्रवास करत असून तिचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. मेट्रोमध्ये गर्दी आहे, या गर्दीत एक महिला हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट घेऊन नवऱ्याकडे जात आहे. तिने पतीला चाचणी किट दाखवताच तिचा नवरा आनंदाने उडी मारतो. पती-पत्नी दोघेही एकमेकांना मिठी मारतात. महिलेने तिच्या @hey_arti_01 अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत ४१ लाख लोकांनी पाहिली असून २ लाख ८० हजार लोकांनी लाईक केली आहे.
अशा कमेंट व्हिडिओवर आल्या
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक जण कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले – तुम्ही मेट्रोमध्ये गर्भधारणा चाचणीसाठी गेला होता का? आणखी एकाने लिहिले- दिल्ली मेट्रोला आता माता-बालक केंद्र बनवण्यात आले आहे. तिसऱ्याने लिहिलं- दिल्ली एम्समध्ये जा. तेथे मेंदूची चाचणी आणि प्रसूती दोन्ही होतात. त्याचप्रमाणे, आणखी एका युजरने लिहिले – मी मेट्रोमध्ये असताना हे सर्व का होत नाही?