माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत खिरगव्हाण ग्रामपंचायत येथे ग्राम स्वच्छता
अंजनगाव सुर्जी — प्रतिनिधी
माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खिरगव्हाण समशेरपुर ग्रामपंचायत कार्यालय तर्फे विविध उपक्रम राबविल्या जात आहे. त्याच पैकी एक भाग म्हणुन दि.२४/०४/२३ रोजी ग्राम स्वच्छता करण्यात आली. ग्राम स्वच्छतामध्ये गावातील सर्व गार्डन स्वच्छता करण्यात आली. गावातील प्रत्येक गल्ली स्वच्छ करण्यात आली. सुखा कचरा व ओला कचरा घंटागाडी मध्ये वेगळा करुन कचरा संकलन ठिकाणी टाकण्यात आला. गार्डनमधील पाला पाचोळा, गांडुळ खत निर्मीतीसाठी टाकण्यात आला. या ग्राम स्वच्छता उपक्रमासाठी श्री नरहरी रायपुरे उपसरपंच,ग्रा.पं.खिरगव्हाण, हर्षेल काकड ,गजानन घोगरे सदस्य,वासुदेवराव कुलट माजी सरपंच खिरगव्हाण,नंदकिशोर प्रल्हाद घोगरे, नितीन पाटील घोगरे,गजानन मधुकर घोगरे,पंकज गावंडे,सतीश पांडे, पंकज घोगरे,योगेश घोगरे,अविनाश पांडे, ग्रामस्थ,अजय बाविस्कर ग्रा.पं.कर्मचारी ईत्यादी ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.