साकोली येथे रोजगार मेळावा संपन्न
शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा भव्य रोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथे संपन्न
110 उमेदवारांची प्राथमिक निवड – 40 उमेदवारांना प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी नियुक्तीपत्राचे वाटप
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.00 ते सकाळी 11.00 या वेळेत पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली याठिकाणी आयोजीत करण्यात आलेले होते. सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा चे सहायक आयुक्त श्री. सुधाकर झळके, औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली चे प्राचार्य श्री. आर. एस. जाधव, ककौविरोवउमा अधिकारी भाऊराव निंबार्ते, वरिष्ठ लिपीक तथा मेळावा नोडल अधिकारी एस. के. सय्यद, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनू उके, जिल्हा समन्वयक सुहास बोंदरे, गट निदेशक विजय कावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व उद्घाटनपर भाषणात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा चे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी नोकरी प्राप्त करावी. तसेच कंपनी/आस्थापनेच्या ठिकाणी अनुभव घेवून पुढे वाटचाल करावे असे मार्गदर्शन केले. गट निदेशक श्री. विजय कावडे यांनी रोजगार/स्वयंरोजार करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावे असे आवाहन केले. प्राचार्य आयटीआय साकोली श्री. आर. एस. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रोजगार मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आजचे युग हे कौशल्याचे युग असून ज्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांना रोजगार हमखास मिळेल त्यासाठी आयटीआय मधील विविध ट्रेड मध्ये प्रशिक्षण पूर्ण करुन औद्योगिक आस्थापनेमध्ये अनुभव घ्यावे असे मार्गदर्शन केले.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये स्थानिक जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील नामाकिंत 6 कंपन्यानी त्यांच्याकडील उपलब्ध पदासाठी मुलाखती घेतल्या व याच दिवशी 110 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. 40 उमेदवारांना प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष 183 उमेदवार उपस्थित होते तर गुगल फॉर्म च्या माध्यमातून 115 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती आणि त्यांचे तज्ञ मार्गदर्शकाद्वारे उमेदवारांना समुपदेशन करण्यात आले. तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या उमेदवारांकरीता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, बॅक ऑफ इंडीया साकोली, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या स्टॉलच्या माध्यमातून 752 उमेदवारांनी स्वंयरोजगाराबाबतच्या योजनांची माहिती घेतली. सदर रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता ककौविरोवउमा अधिकारी भाऊराव निंबार्ते, श्री. एस. के. सय्यद, वरिष्ठ लपीक तथा नोडल ऑॅफीसर, श्री. सोनु उके जिल्हा समन्वयक, श्री. विजय कावडे गट निदेशक, श्री. सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, श्रीमती प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, मीरा मांजरेकर एमजीएनएफ, श्रीमती आशा वालदे वरिष्ठ लिपीक, श्री. आय. जी. माटुकर, तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली चे निदेशक श्री. कार्तीक लाडे, श्री. सोलंकी, श्री. वैभव रामटेके, श्री. कुरसुंगे, श्री.रामटेके, श्रीमती करोडे, श्रीमती वैद्य तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच एनएसएस चे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.