क्राइम

अंजनगाव तालुक्यातील हंतोडा येथे शेतशिवारात अज्ञान चोट्यांचा 16 बकऱ्यांवर डल्ला ,

Spread the love

 

अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे )

आज पर्यंत वाहन चोरीचा घर फोडी, ईत्यादी प्रकार तालुक्यामध्ये पाहायला मिळत होते. परंतु आता चोरांनी आपले लक्ष जनावरांच्या चोरीकडे वळवले असून काल दि 21 एप्रिल रात्री उशिरा हंतोडा शेतशिवार अज्ञात चोरट्यांनी 16 बकऱ्या चोरून नेण्याची मोठी घटना घडली असून त्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .
सविस्तर वृत्त असे की ,हंतोडा येथे शेत शिवारात सुरेशराव शे. गोळे वय 54 वर्ष यांचे शेत असुन या शेतामध्ये त्यांनीबआपल्या उदर निवाहसाठी बकऱ्या विकत घेऊन त्यांचे पालनपोषण करत होते .,तसेच या बकऱ्याची रखवाली करण्यासाठी एक रखवालदार सुद्धा त्यांनी ठेवला होता परंतु तो काही कामानिमित्त दहा दिवसापूर्वी बाहेरगावी गेल्या असल्यामुळे या बकऱ्यांची रखवाली कुटुंबातील सदस्य करत होते . परंतु रात्रीच्या वेळेस गोळे हे बकर्यांना चारा पाणी करून ते घरी वापस येत असत . सकाळी पाच वाजता गाईचे दूध काढण्यासाठी अंकुश गोळे शेतात गेले असता त्यांना बकऱ्या आढळून आल्या नाहीत त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला परंतु त्यांना बकऱ्या दिसल्या नाहीत . त्यामुळे दि 23 ला अंजनगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञान चोरट्या विरुद्ध १६ बकऱ्या नेल्याची तक्रार अंकुश गोळे यांनी दाखल केली आहे अंदाजे १६ बकऱ्यांची एकूण किंमत एक लाख १८ हजार रुपये वर्तवली जात आहे . अंजनगाव पोलिसांनी अज्ञान चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे .सदर प्रकरणाचा तपास पोलीस ठाणेदार दीपक वानखडे , हेड कॉन्स्टेबल व्ही, एस राठोड करीत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close