शेती विषयक

पुढील 4 – 5 दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा

Spread the love

         मागील काही दिवसात मोसम बदल होत असल्याने काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा होत आहे. यामुळे शेतकरी आधीच चिंतातुर झाला आहे. अश्यतच आता येणाऱ्या 4- 5 दिवसात हवामानात मोठा बदल होत असल्याने पुन्हा राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 24-25 एप्रिल पासून म्हणजेच उद्या परवा पासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता कायम राहणार आहे.

उद्यापासून पडणारा पाऊस हा उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील कायम राहणार आहे. अर्थातच कोकण वगळता जवळपास संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

निश्चितच राज्यात पुन्हा एकदा गारपीट होणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला असल्याने जर हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या काढणी योग्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

डख यांच्या मते मराठवाड्यात 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता राहणार आहे.

पूर्व विदर्भात आज पासून ते 29 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भात 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे तसेच काही भागात गारपीट देखील होऊ शकते असे मत डख यांनी व्यक्त केले आहे.

खरं पाहता सध्या मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी भागात हळद, कांदा, मका तसेच काही शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकाची देखील काढणी सुरू आहे. अशातच हवामानात होणारा हा बदल आणि गारपीटीची शक्यता शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. पंजाबरावांनी वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामुळे होऊ शकते असं जाणकार नमूद करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close