भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी :- भगवान परशुराम जन्मोसव निमित्त शहरामध्ये सकल ब्राह्मण समजाने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते . संध्याकाळी 7 वाजता भगवान परशुराम मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून प्रताप भवन येथून शोभा यात्रेला ढोल ताशाच्या गजरात शोभा यात्रेला सुरुवात झाली. रामदेव बाबा मंदिर, पदमावती चौक, शिवाजी चौक ,गांधी चौक, सराफ लाइन,खडक पुरा मार्गाने शोभायत्रा पुष्पकर्ण भवन सभागृहामध्ये पोहोचल्यानंतर तेथे समारोप करण्यात आला.
भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सकाळी पुष्पकर्ण भवनामध्ये विधिवत अभिषेक व पूजा अर्चा करून सुंदर कांड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायत्रा मार्गावर अनेकांनी रथावर विराजमान भगवान परशुरामाच्या मुर्तीची पुजा अर्चा केली. गांधी चौक येथे सुमित वानखेडे ,उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी भगवान परशुराम यांची पूजा केली.
शोभायात्रा मार्गावर अनेक ठिकाणी पानी,शरबत, व नाश्ता चे वाटप करण्यात आले
शोभायात्रेमध्ये प्रेम राज पालीवाल,अनिल जोशी, राजाभाऊ गिरधर, डॉ विनय देशपांडे,प्रकाश दवे, श्रीकांत पेंडके,कल्पेश दवे, राजू पालीवाल,राजू शर्मा, दिलीप खंडेलवाल,सुनील जोशी, विवेक वैद्य ,सतीश देशपांडे,तरुण दवे, विनय डोळे,अभय दर्भे,राजाभाऊ देशपांडे, धनंजय चौबे, सुनील बाजपेयी, हरीश तांबोळी,पप्पू जोशी ,दर्शन पुरोहित,मोनू छांगानी,आयुष पालीवाल ,पीयूष पालीवाल,मंगेश जोशी,हितेश कट्टा,योगेश पुरोहित ,विजय पुरोहित,अभय पांडे, मुधोळकर,अशोक पालीवाल,मोहन छांगानी,गोलू जोशी ,दिलीप दवे,कमल व्यास, रिषि चौबे,
, सुनील जोशी, अभिषेक शुक्ला, मंगेश जोशी, अनिल पांडे,, पूरन चौबे, पीयूष पालीवाल, मथुरेश पुरोहित, मोहित कट्टा, श्रीकांत करमरकर, अमित पालीवाल, विक्की पालीवाल, अनंता झाड़े, श्यामा प्रसाद पांडे, अभय पांडे, गोपाल जोशी, आदी मोठ्या संख्येने सकल ब्राह्मण समाजाचे सदस्य व महिला उपस्थित होते.
परशुराम विप्र मंडळ पदाधिकारी,सदस्य यांनी मिरवणूक यशस्वी करन्याकारिता परीश्रम घेतले.