रामदेवबाबा सॉलवंट ने चलविला आहे नागरिकांच्या जीविताशी खेळ
रसायनयुक्त पाणी सोडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका
तालुका, व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष,
प्रदूषण मंडळ झोपेत,
मौदा प्रतिनिधी / प्रतिनिधी तालुक्यातील महादुला येथे रामदेव बाबा सालवंट कंपनी कार्यरत आहे. ही कंपनी गावाशेजारी असून कंपनी मधून रोज रसायनिक्त पाणी बाजूच्या नाल्यात सोडल्या जात असल्याने हेच पाणी सांड नदी द्वारे वाहत असल्याने नदी काठावरील असलेल्या गावातील जनतेला याचा मोठा फटका व त्यांच्या जीवाला धोका उद्भवत असल्याचे दिसुन येते. स्थानिक तालुका व ग्रामपंचायत प्रदूषण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते यावर शासनाने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.
कंपनीच्या संचालक मंडळांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून यापुढे आमच्याकडून प्रदूषण होणार नाही अशी लेखी हमी दिली होती. आणि ग्रामपंचायत ने सुद्धा ठराव घेऊन हे प्रकार झाल्यास आपण नक्कीच कार्यवाहिला जबाबदार राहाल असेही लेखी पत्र देण्यात आले. तर कंपनी संचालक मंडळानी दिलेला शब्द पडला नसल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे बनली आहे. आज महादूला परिसरातील शेतकरी कंपनीच्या या रसायनयुक्त पाण्याने फार मोठ्या संकटात सापडले आहेत .त्यांनी अनेकदा परिणामी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. पण त्यांनी कारवाई केवळ कागदावरच दाखविली आहे. यावर तालुका प्रशासन व ग्रामपंचायत सुद्धा गप्प असून पाणी मूरते कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यावर कंपनी वर प्रशासन कार्यवाही का म्हणून करीत नाही. किव्हा प्रशासन कुणाच्या मरणाची तर वाट पाहत नाही ना? असाही प्रश्न जनतेला पडला आहे.
रसायनयुक्त पाणी स्वच्छ करून ते बाहेर सोडावे असा नियम सर्वांनाच लागू आहे. मग रामदेव बाबा सालवंट कंपनीला रसायनयुक्त पाणी सोडण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न पडला आहे. आज रसायन जलस्त्रोतात मिसळल्याने भुगर्भातील पाणी खराब होत आहेत. पुढे या गावाची परिस्थिती विचित्र झाल्यास याला जबाबदार कंपनीतील संचालक मंडळ राहील असेही बोलल्या जात आहे. दररोज कंपनी मधून पाणी सोडल्या जात असल्याने त्या पाण्यापासून जवळ असलेल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकड़े तात्काळ सबंधित अधिकारी यांनी पाहणी करुण कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.