समजा तिने तुमचे पण खाल्ले की तुमचे जमले
बिहार / नवप्रहार न्यूज नेटवर्क
देशात विविध राज्यात विविध समाजातील विविध जातीमच्या लोकांच्या विविध प्रथा आहेत. प्रत्येक समाजाने आपली एक प्रथा (रिवाज ) बनवून ठेवला आहे. समाजातील लोकांना त्याचे पालन करणे अनिवार्य असते नाही तर त्यांना पण पंचायतीने दिलेला निर्णय मान्य करावा लागतो.लग्न समारंभात किंवा अन्य धार्मिक आयोजनाच्या वेळी या प्रथेचे पालन करावे लागते. बिहार कॅग्या आदीवासी समाजात लग्न जुळण्यासाठी जी प्रथा आहे.” ते ऐकून तुम्ही देखील आश्चर्य चकित व्हाल. बिहारमधील पूर्णिया मधील बनमनखी उपविभागातील मलियानिया दियारा गावात असलेल्या जत्रेचा इतिहास १५० वर्षांहून अधिक जुना आहे.
अविवाहित मुला-मुलींना या पारंपारिक जत्रेत खूप रस असतो आणि बिहारव्यतिरिक्त पश्चिम बंगाल, झारखंड आणि नेपाळमधूनही लोक इथे येतात.
आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे
दरवर्षी एप्रिल महिन्यात भरणारा हा मेळावा प्रामुख्याने आदिवासींकडून आयोजित केला जातो. त्यापर्यंत पोहोचणाऱ्या मुला-मुलींना आपल्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य असते. जत्रेत येणारी मुलं आपल्या आवडीच्या मुलीला पान देऊन लग्नासाठी प्रपोज करतात आणि मुलगी पान खात असेल तर याचा अर्थ तीही त्या मुलावर प्रेम करते.
जर मुलगी पान खात असेल तर…
जत्रेत मुलाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर मुलगी घरच्यांच्या संमतीने मुलासोबत जाते. यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत लवकरच आदिवासी रीतीरिवाजानुसार मुला-मुलीचे लग्न केले जाते. जत्रेच्या आयोजकांपैकी एक आणि माजी सरपंच म्हणतात की, जत्रेत येणाऱ्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर तिला प्रपोज करण्यासाठी तो पान खाण्याची ऑफर देतो. जर मुलगी पान खात असेल तर याचा अर्थ असा होतो की ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे आणि जर ती खात नसेल तर याचा अर्थ तिला त्या मुलाशी लग्न करायचे नाही.
लग्न ठरविल्यानंतर लग्नास नकार देणे दंडनीय
माजी सरपंच म्हणतात की त्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्यात अनेक अशा मुला-मुलींना पाहिले आहे ज्यांनी प्रेम व्यक्त करून लग्न गाठ बांधली आहे. लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांना एक अट मान्य करावी लागते आणि त्यानुसार आदिवासी परंपरेनुसार त्यांचे लग्न केले जाते. हे लग्न करताना निसर्गाला आपले आराध्य दैवत मानले जाते.जर जत्रेत आवडल्यानंतर कोणी लग्नास नकार दिला तर त्याला आदिवासी समाजाच्या कायद्यानुसार शिक्षा होते.