सावित्री शक्तीपीठ,नेर चे वतीने होतकरू महिलांचा सत्कार

नेर प्रतिनिधी / रेणुका जयस्वाल
सावित्री शक्तिपीठ पुणे ,महाराष्ट्र शाखा नेर च्या वतीने महात्मा जोतिराव फुले स्मारक,नेर येथे राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजातील काही उद्योजक,होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला.. हा सत्कार करण्या मागचा त्यांचा हेतू म्हणजे समाजातील छोटो मोठे उद्योग करून आपल्या कुटुंबाला हातभार करणा-या महिलांना प्रोत्साहन देणे होय.. हा कार्यक्रम सावित्री शक्तीपीठ नेर चे अध्यक्ष सौ प्रतिभा प्रवीण चांदोरे, उपाध्यक्ष अर्चनाताई राऊत, सचिव हिना परोपटे , संघटक सुविधा केवटे. सदस्य मायाताई तिखे ,वैशालीताई गोबरे, छायाताई पंधे, यांनी आयोजित केला होता.. या प्रसंगी प्रमुख अतिथी सौ.वैशालीताई मासाळ, नगरसेविका. . तसेच सौ. विमलताई चांदोरे उपस्थीत होत्या… कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रतिभा चांदोरे यांनी तर आभार प्रदर्शन सौ हिना परोपटे यांनी केले. महिलांना सक्षम करण्याकरिता फुले दांपत्याच्या विचारांची आज नितांत गरज आहे .. आणि महिलांनीच महिलांचा सत्कार करणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन आपल्या मनोगता मधुन सौ. मासाळ यांनी व्यक्त केले.. या कार्यक्रमात शारदाताई राऊत, अर्चनाताई केवटे, नीलिमाताई बोरुले, वैशालीताई उमरतकर , इंगळेताई यान्हा उद्योजक महिलांचा सत्कार शाॅल व झाड देवून करण्यात आला.
या प्रसंगी विनोद गोबरे,प्रदिप शेंदुरकार,प्रवीण चांदोरे, गणेश राऊत ,संदिप ठक,संदिप चौधरी,कुद्दुस मिस्त्री,राजुभाऊ देऊळकर,प्रफुल आकोलकर,माया राणे,विलास देशमुख यान्ही उपस्थित दर्शविली