शाशकीय

नवी मुंबईत घडली भयानक घटना  ; कार चालकाने  वाहतूक पोलिसाला नेले 20 किमी फरफटत

Spread the love

नवी मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                नवी मुंबईत एका भयानक घटना घडली आहे. एका कार चालक तरुणाने ट्राफिक सिग्नल वर कार थांबविण्यास सांगणाऱ्या वाहतूक पोलिसाला 20 किमी पर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने वाहतूक पोलीस सुरक्षित आहे. पण या घटनेनंतर लोकांना कायद्याचे भय उरले किंवा नाही असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्राफिक पोलिस कारच्या बोनेटवर कसाबसा स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. त्याचं नाव आदित्य बेमडे असं असून तो नेरुळमध्ये राहतो. पोलिसांनी सांगितलं की तो नशेत गाडी चालवत होता.

ट्राफिक पोलीस सिद्धेश्वर माळी हे कारच्या बोनेटवर अडकल्याने थोडक्यात वाचले. जवळपास २० किमी अंतर ते जीव मुठीत धरून कारच्या बोनेटवर होते. पाम बीच रोडवर असणाऱ्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. ट्राफिक पोलिस सिद्धेश्वर माळी ब्लू डायमंड जंक्शनवर रेड सिग्नल तोडणाऱ्या आणि स्कूटरला धडक देणाऱ्या कारला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कार चालकाने गाडीचा वेग वाढवला.

 वाहन चालकाला थांबवताना वाहतूक विभागाकडून ब्लू डायमंडजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. सर्व वाहने थांबवून तपासणी करून पुढे पाठविण्यात येत होती. यावेळी वाहतूक कर्मचार्‍याने एका कार चालकाला थांबवण्यास जाताच त्यांनी गाडीचा वेग वाढवला.

त्याला पकडण्यासाठी वाहतूक पोलीस गाडीच्या समोर गेला तेव्हा वाहतूक कर्मचारी त्याच्या बोनेटवर चढले. पोलिस कर्मचाऱ्याला बोनेटवर बसलेले पाहून कार चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि त्याला ओढत गव्हाण फाट्यापर्यंत गेला. वाशी ब्लू डायमंडपासून हे अंतर सुमारे 20 किलोमीटर इतकं आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, कार चालकाने त्याला बोनेटवर बसवले आणि पुढे गेल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग करून गव्हाणजवळ कारसमोर टँकर उभे केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close