Uncategorized

नवप्रहार चा दणका ; विटाळा घाटातील ती बोट महसूल विभागाकडून नेस्तनाभूत

Spread the love

महसूल विभागाच्या चमुची लक्षवेधक कारवाई

पहिल्यांदा पोलीस विभागाचे पाठबळ असलेल्या वाळू माफियांवर महसूल विभागाची कारवाई
ब्रेव्ह  महसूल विभाग ब्रेव्ह
अमरावती / विशेष प्रतिनिधी
           विटाळा घाटातून अवैध उपसा करणाऱ्या त्या बोटीवर कारवाई करण्यात आली असून बोटीला जाळून पूर्णतः नेस्तनाभूत करण्यात आले आहे. पोलीस विभागाचे पाठबळ असलेल्या वाळू माफियांवर पहिल्यांदाच अशी लक्षवेधक कारवाई करण्यात आल्याने महसूल विभाग अभिनंदनास पात्र ठरला आहे. मुख्य म्हणजे कालच ‘ नवप्रहार ‘ ने बातमी प्रसिद्ध करून पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे लक्ष वेधले होते.
                        घाट लिलाव न झाल्याचा गैरफायदा घेत पुलगाव आणि चांदुर रेल्वे येथील वाळू माफियांकडून विटाला घाटातून बोटीच्या साह्याने वाळू उपसा सुरू होता. नवप्रहार ला या अवैध उत्खननाबाबत  माहीती झाल्यावर एक भारतीय नागरिक या नात्याने शासकीय संपत्तीच्या नुकसानी बाबत शासन आणि प्रशासन यांना माहिती करून देण्यासाठी सदर बातमी प्रसिद्ध करणे आपले उत्तरदायित्व समजत आम्ही ती बातमी आमच्या दि. 12 एप्रिल च्या  अंकात  ‘ विटाळा घाटातून बोटीच्या साह्याने होत आहे  वाळू उपसा ‘ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत महासुल विभागाने सदर बोट जाळून नेस्तनाभूत केली आहे.
पोलीस विभागाचे वाळू माफियांना होते पाठबळ ? – – नवप्रहार ला सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या अवैध उत्खननाला कथित रित्या पोलीस विभागाचे पाठबळ असल्याचे बोलल्या जात होते. ‘ बाल की खाल ‘ काढण्यात माहीर नवप्रहार ला याबद्दल माहिती मिळाल्यावर जेव्हा नवप्रहार ने पोलीस विभागात असलेल्या आपल्या सूत्रांचा उपयोग केला तेव्हा समजले की एलसीबी आणि मंगरूळ दस्तागिर ठाणेदार यांना वाळू माफियांनी ‘बिदागी ‘ देऊन याकडे कानाडोळा करण्यास बजावले होते. नवप्रहार ने आपल्या बातमीत ‘ एलसीबी आणि मंगरूळ ठाणेदार मॅनेज असल्याची चर्चा ‘ याचा उल्लेख देखील केला होता.
महसूल विभागाची लक्षवेधक कारवाई  –  वाळू माफियांकडून कारवाई साठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्याने  वाळू माफिया माफियांवर महसूल अधिकारी आणि कर्मचारी कारवाई साठी धजावत नाही पण यावेळी मात्र महसूल विभागाने पोलीस विभागाला कुठलीही सूचना न देता कारवाई केल्याने महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठी अभिनंदनास पात्र असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवप्रहार वर देखील अभिनंदनाचा वर्षाव – जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात ‘ जे दिसेल ते छपेल ‘ यावर सुरवातीपासून अमल करीत असलेल्या नवप्रहार ने ही बातमी देखील संपूर्ण पुरावे गोळा करून प्रकाशित केली होती. या नंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि महसूल विभागाने कंबर कसत न भूतो न भविष्यती कारवाई केली. ही बाब नागरिकांना माहिती झाल्यावर नवप्रहार वर अभिनंदसनाचा वर्षाव होत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close