दादाला शह देण्यासाठी उस्ताद ने निवडला मोहरा
मावळ: / नवप्रहार डेस्क
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडल्यानंतर वेगळे झालेल्या शिंदे आणि अजित दादा पवार यांनी महायुतीला आपला पाठिंबा देत ते सरकार मध्ये शामिल झाले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजित दादा सोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीत ठरल्या प्रमाणे जागा वाटपाच्या फॉरमुल्यात ज्या ठिकणी ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच्यासाठी सुटणार असे ठरले असल्याने मावळची जागा अजित पवार गटाला जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महायुतीतील नाराज नेते पर्यायी पक्षाच्या भूमिकेत आहेत. दरम्यान सुनील शेळकेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवारांकडून रणनीती आखली जात आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत अंतर्गत संघर्ष असल्याचे आता लपून नाही. यामध्ये सुनील शेळके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेचेच बापू भेगडे आणि भाजपचे रवी भेगडे यांनी शड्डू ठोकला आहे. यात बापू भेगडे यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आणि सुनील शेळके यांच्यावर असलेली नाराजी आता लपून राहिलेली नाही. मात्र बापू भेगडेंची नाराजी अजित पवार दूर करतील अशी चर्चा आहे
रवी भेगडे यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे रवी भेगडे यांना मावळ भाजप मधील युवक कार्यकर्ते, महिला आघाडी आणि मावळच्या जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याच चित्र पाहायला आहे. त्यामुळे रवी भेगडे जो निर्णय घेतील आपण त्यासोबतचं आहोत असे म्हणणारा भाजपचा एक मोठा गट तयार झाला आहे.
इतकंच नाही तर रवी भेगडे यांनी तुतारी हातात घेतली किंवा महाविकास आघाडी पुरस्कृत झाले तरी देखील आपण त्यांचीच साथ देणारं असं देखील हे लोक म्हणत आहेत. रवी भेगडे यांचे लागलेले बॅनर, त्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता रवी भेगडे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत रवी भेगडे शरद पवारांच्या गळाला लागतील आणि २०२९ ची मावळात पुनरावृत्ती घडेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.